Next
मोबाइल पेमेंट सेवेसाठी केवायसी आवश्यक
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 01:55 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एक मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मोबाईलद्वारे पेमेंटची सुविधा देणाऱ्या कंपन्यांना या सेवेसाठी ग्राहकांकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ‘पेटीएम’ची संपूर्ण केवायसी प्रक्रिया अतिशय सोपी, सुरक्षित आणि मोफत आहे. ही पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी आवश्यक असून, ही संपूर्ण कागदरहित प्रक्रिया आहे. यात आधारच्या उपयोगाद्वारे बायोमेट्रिक तपशिलांची पुष्टी मिळते.
 
केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना पेटीएमद्वारे विशेष ऑफर देण्यात येत आहे. यात पेटीएम खात्यात एक लाख रुपये साठविण्याची सुविधा, दुसऱ्या एखाद्या पेटीएम खात्यात एक लाख रुपयांपर्यंत शिल्लक हस्तांतरणाची सुविधा, तसेच एखाद्याच्या बँक खात्यात दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत हस्तांतरणाची सुविधा देऊ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त एका मिनिटाहून कमी कालावधीत मोफत पेटीएम पेमेंट बँक खाते उघडण्यासह दोनशे रुपयांपर्यंत कॅशबॅकही देण्यात येत आहे.

‘पेटीएम वॉलेट’चा वापर करीत राहण्याकरिता किमान केवायसी प्रक्रिया करता येऊ शकते. वॉलेटला आपल्या आधार, पॅन, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नरेगाच्या कागदपत्रांसह जोडता येऊ शकते. यात बारा महिन्यांच्या वैधतेसह मर्यादित सुविधा मिळतात. किमान केवायसीद्वारे, ग्राहकांना अधिकतम शिल्लक आणि मासिक खर्चाची मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पूर्ण केवायसी आधार नंबरद्वारे करता येऊ शकते. वॉलेटची केवायसी प्रक्रिया हे एक स्वागतार्ह पाऊल असून, याद्वारे फसवणुकीला चाप बसेल आणि आर्थिक प्रक्रिया सुरक्षित बनेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link