Next
हातमागावर तयार केले पार्टीवेअर गाउन
प्रेस रिलीज
Saturday, April 14, 2018 | 12:24 PM
15 0 0
Share this story

इरकल हातमाग रेशीम कापडापासून नाविन्ययपूर्ण गारमेंटची निर्मितीचे सादरीकरण करताना ‘डीकेटीई’च्या विद्यार्थिनी.

इचलकरंजी : येथील डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमधील ‘टेक्स्टाईल’च्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वस्त्र बनविणाऱ्या हातमागावर विव्हिंग करून आधुनिक गारमेंट्सची निर्मिती केली. तयार झालेले गारमेंट्स हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित फॅशन शोसाठी उपयुक्त असे ठरणारे आहेत. पारंपरिक हातमागावर तयार केलेल्या कपड्यांना आधुनिकतेचा साज चढवत त्याद्वारे पार्टी वेअर गाउन तयार करण्यात या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.

हातमागावर तयार केलेले कापड जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी गुणवत्ता आणि किंमत यात सुसूत्रता यावी या दृष्टीकोनातून ‘डीकेटीई’च्या विद्यार्थिनींनी हातमागावर विणलेल्या कापडाची वैशिष्ट्ये विचारात घेऊन व त्यावर विविध डिझाइन्सची रचना करून तयार झालेल्या इरकली साड्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तयार झालेल्या या गारमेंट्सना विविध स्तरावरुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘डीकेटीई’च्या अंतिम वर्ष फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या सलोनी पुरंदरे, शगुफ्ता मैंदरगी, रिद्धी गुप्ता, शिवानी रामधम या विद्यार्थिनींनी ‘डिझाइन अँड डेव्हलपमेंट ऑफ हॉटकुटर गारमेंटस युझिंग ट्रॅडिशनल फॅब्रिक्स’ या विषयावर प्रकल्प पूर्ण केला आहे. याअंतर्गत विद्यार्थिनींनी सिल्क यार्नसची निर्मिती सेंट्रल सिल्क बोर्ड (बेंगलोर) येथे केली व यासाठी विद्यार्थिनींना त्यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. या सर्व धाग्यांचे गुणधर्म सेंट्रल सिल्क बोर्ड येथे तपासण्यात आले. त्यानंतर त्यांना या धाग्यांचा वापर करून इरकल येथील ‘सर्वोदय सिल्क हाउस’ येथील हातमागावर विव्हिंग केले. त्यांनी वार्पमध्ये मलबेरी फिलेचरचा वापर केला व वेफटमध्ये मलबेरी फिलेचर, मलबेरी स्पन, तसार, मुगा, इव्ही, बनाना याचा वापर करून एकूण सहा फॅब्रिक्सची निर्मिती केली. तयार झालेल्या कापडावरील गुणधर्मांची चाचणी केल्यानंतर गारमेंटसची निर्मिती करण्यात आली.

साडीवर विविध मोटीफचा वापर करून नवीन डिझाइनची रचना करून आकर्षक बनविले व तयार झालेल्या गारमेंट्ससाठी डिझाइनर्सचे रिव्ह्यू घेतले व त्यातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे तयार झालेले प्रॉडक्ट्स हे सेंट्रल सिल्क बोर्डाच्या ‘प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्युझियम’ येथे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. अशा सामाजिक प्रकल्पामुळे हातमागाला चालना मिळू शकते व रोजगारीच्या संधी निर्माण होतात. याचबरोबर पारंपरिक वस्त्र निर्मितीचा वसा ही जपला जातो.

या प्रकल्पासाठी संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, प्रा. एल. जी. पाटील, प्रा. जे. आर. नागला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link