Next
‘उबर’ने गाठला एक अब्जाहून अधिक राइड्सचा टप्‍पा
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 02:14 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : जगातील सर्वात मोठी राइड शेअरिंग कंपनी ‘उबर’ने भारत व दक्षिण आशिया प्रांतामधील एक अब्जाहून अधिक राइड्ससह आणखी एक सुवर्ण टप्‍पा गाठला. पाच वर्षांपूर्वी ‘उबर’ने बेंगळुरूमधून भारतात आपल्‍या सेवेचा शुभारंभ केला होता आणि याच शहरामध्‍ये ही अब्जाचा टप्पा गाठणारी ट्रिप घेण्‍यात आली. त्‍याचवेळी मुंबईमध्‍ये एक, हैद्राबादमध्‍ये दोन आणि दिल्‍लीमध्‍ये तीन अशा सहा इतर ट्रिप्‍सचे देखील बुकिंग करण्‍यात आले.

या सुवर्ण टप्‍प्‍याबाबत बोलताना ‘उबर’ भारत व दक्षिण आशियाच्‍या राइड्स विभागाचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष प्रदीप परमेस्वरन म्‍हणाले, ‘हा भारत व दक्षिण प्रांतासोबतच संपूर्ण ‘उबर’ परिवारासाठी अत्‍यंत उत्‍साही व लक्षणीय टप्‍पा आहे. एक अब्‍जाचा टप्‍पा म्हणजे ‘उबर’सारखे तंत्रज्ञान शहरी प्रवासाच्‍या भवितव्‍याला परिभाषित करू शकते याचा पुरावा आहे. आम्‍ही या प्रांतामध्‍ये आणखी १० बिलियन राइड्सची सेवा देण्‍यासाठी सज्‍ज आहोत. या सुवर्ण टप्‍प्‍यामधून आम्‍हाला लाखो राइडर्सना आरामदायी व परवडणाऱ्या राइड्स देण्‍याची आणि विविध वाहतुकीच्‍या साधनांमधील लाखो ड्रायव्‍हर भागीदारांना कमावण्‍याची संधी देण्‍याची प्रेरणा मिळेल.’

‘उबर’ने १० जून रोजी जागतिक पातळीवर १० अब्ज ट्रिप्‍सचा आणखी एक सुवर्ण टप्‍पा गाठला. या सुवर्ण टप्‍प्‍यामध्‍ये सामील असलेल्‍या १७३ ट्रिप्‍समध्‍ये अहमदाबादमधील एक व दिल्‍ली एनसीआरमधील एक अशा दोन ट्रिप्‍सचा समावेश होता. ‘उबर‘’ला प्रांतामध्‍ये जलद प्रतिसाद मिळत आहे आणि कंपनीने भारत व दक्षिण आशियामध्‍ये ५०० दशलक्ष ट्रिप्‍सचा टप्‍पा पूर्ण केल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच हा एक अब्जाचा टप्‍पा गाठला आहे.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search