Next
‘लाईव्ह.मी’चा ‘क्विझबिझ’ गेम शो
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 12:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारताचा पहिला लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मंच ‘लाईव्ह.मी’ अॅपने (Live.me) विलक्षण व अनोख्या लाईव्ह भारतीय क्विझ गेम शो ‘क्विझबिझ’चे आयोजन केले होते. या गेम शोचे सूत्रसंचालन यूट्यूबवर लोकप्रिय असलेल्या साहिल खट्टरने केले.

हे एक नवीन व्हिडिओ अॅप आहे जे १७ सेकंद लांबीपर्यंतचे व्हिडिओ बनवणे, शेअर करणे व शोधणे यासाठी समर्पित आहे. अॅपमध्ये विविध सुविधा दिलेल्या आहेत, जसे की डान्स ऑफ, गेमसारखी सुविधा ज्यामध्ये यूझर्सना पुनरावृत्ती करण्यास नृत्याच्या हालचाली दाखवलेल्या आहेत. यूजर गूगल प्ले व अॅप स्टोरद्वारे ‘लाईव्ह.मी’ अॅप डाउनलोड करू शकतात; तसेच ते प्लॅटफॉर्मवर चीझ (Cheez) अॅक्सेस करू शकतात.         

‘लाईव्ह.मी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी युकी ही म्हणाले की, ‘आजच्या तरुणांमध्ये साहिल खट्टर हे एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्याच्या प्रदर्शनाची विविध वयोगटातींल श्रोत्यांद्वारे प्रशंसा केली जाते. त्याचा निरीक्षणात्मक विनोद आणि प्रत्येक संभाषण उत्तम बनवण्याची अंगभूत हातोटी या अशा गोष्टी आहे ज्याची ‘क्विझबिझ’च्या सहभागींना उत्सुकता होती. यासोबतच हंगामाची सर्वात मोठी बक्षिस रक्कम म्हणजे १० लाख मिळवण्याची संधी या नवीन ‘क्विझबिझ’च्या आकर्षणाकडे यूझर्सनी पाठ फिरवणार नाही याची आम्हाला खात्रीच होती.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link