Next
महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर
प्रेस रिलीज
Tuesday, March 13, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

कर्करोगाविषयी मार्गदर्शन करताना दीपाली चव्हाण व कविता राजपूत

पुणे : ‘स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी तसेच, योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो हे अनेक महिलांना माहिती नाही. या विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात यावे, यासाठी कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हायला हवी,’ असे मत ‘यूएसके फाउंडेशन’च्या संस्थापिका डॉ. उषा काकडे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, पुण्यातील युएसके फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या ‘ऊर्जा फोरम’ प्रकल्पांतर्गत अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी या वस्तीपातळीवरील आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी, हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘प्रशांती कॅन्सर केअर सेंटर’च्या दीपाली चव्हाण व कविता राजपूत यांनी महिलांना स्तनाच्या कर्करोगाविषयी मार्गदर्शन केले.

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय, तो कशामुळे होतो, कोणत्या स्थितीमध्ये तो अधिक धोकादायक असतो, योग्यवेळी निदान आणि उपचार यामुळे तो पूर्णतः बरा होतो, याविषयी महिलांनी जाणून घेतले. त्याचबरोबर गर्भाशयाच्य कॅन्सरबाबतही या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, कर्करोगासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक महिलेची नावनोंदणी करून, त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. मार्गदर्शन व आरोग्य तपासणी केल्याबद्दल महिलांनी यूएसके फाउंडेशन आणि प्रशांती कॅन्सर केअर सेंटरचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search