Next
‘सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रात ४५ टक्के वाढ’
प्रेस रिलीज
Wednesday, February 28 | 05:06 PM
15 0 0
Share this story

सोलर युनिटचे प्रात्यक्षिक पाहताना आबासाहेब शिंदे, नीलेश ढमढेरे, संजीव पाटील, अश्‍विनी जगताप, लोगेश जनार्दन आणि उन्मेष जगताप.

पुणे :
‘सौरऊर्जा निर्मितीच्या उद्योगात गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढ होत असून, ती सुमारे ४५ टक्के प्रतिवर्ष इतक्या वेगाने वाढत आहे’, असे मत अमेरिकन संशोधक, उद्योजक लेखक आणि ‘क्लीन एनर्जी रिसर्च सेंटर ऑफ युनिव्हर्सिटी साऊथ फ्लोरीडा’चे संचालक डॉ. योगी गोस्वामी यांनी व्यक्त केले.

‘इनो-सोलर एनर्जी प्रा.लि.’ आणि ‘ऊन्पा इंजिनिअरिंग’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ‘विनबील्ड’, ‘ऐम्पोरेस’ व ‘इंडियन्स सोलरहब’ या अमेरिकेतील कंपन्यानी भाग घेतला. ‘सोलर हायब्रिड इनव्हर्टर आणि पॉवर ऑप्टीमायझर होम एनर्जी सेव्हर युनिट’ या अमेरिकेमध्ये संशोधित व संपूर्णपणे ‘मेड इन इंडिया युनिट’चे उद्घाटन राजश्री शाहू बँकेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते झाले.

या वेळी पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष नीलेश ढमढेरे, मुंबईतील श्री सिद्धीविनायक गणपती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, अमेरिकेतील ‘इम्पोरेस’चे संचालक लोगेश जनार्दन, ‘उन्पा इंजिनिअरिंग’चे संचालक अश्‍विनी जगताप, आणि ‘इनो सोलर एनर्जी प्रा.लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेश जगताप, यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीचे सल्लागार बिपीन शहा उपस्थित होते.

डॉ. योगी म्हणाले, ‘इतर कोणत्याही उद्योग धंद्यात इतकी झपाट्याने वाढ होताना दिसत नसून, सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रात नव उद्योजकांना मोठी संधी आहे. सौरऊर्जेमुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील घरगुती वीज व शेतीच्या कामासही मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. यामुळे देशाची प्रगती होईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.’

‘रहिवासी इमारती तसेच व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवरील सौरऊर्जा निर्मितीस सरकार देखील प्रोत्साहन देत असून, पुढील काळात सौरऊर्जा निर्मितीचा वेग प्रचंड वाढेल’ अशी अपेक्षा उन्मेश जगताप यांनी व्यक्त केली; तसेच ‘इंडियन सोलर हब’तर्फे संचालित ‘सोलर प्लॅंट’ देखभालीच्या उपक्रमांत दिव्यांग तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.

बिपीन शहा यांनी शहा ‘यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी’मध्ये संशोधित बिल्डिंगमधील ऊर्जा वापर कमी करण्यासाठीच्या अनेक तंत्रांबद्दल मार्गदर्शन केले.

‘सौरऊर्जा निर्मितीचे प्रमाण जसजसे वाढेल तसतसे त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होऊन ती सर्व सामान्यांच्या आवाक्यात लवकरच येईल,’ असे लोगेश जनार्दन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link