Next
तरुणांना ‘वाचनामृत’ मिळण्यासाठी...
BOI
Friday, April 07, 2017 | 05:44 PM
15 7 0
Share this article:

सध्याच्या धकाधकीच्या काळात निवांत वेळ काढून एखादं पुस्तक घेऊन वाचत बसणं गोड, हव्याहव्याशा स्वप्नासारखं वाटतं. काही जण ‘आळशी’ या गटात मोडत असल्याने पुस्तकाची फक्त सुरुवातच वाचली जाते. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या अमृत देशमुख या तरुणानं देशाला वाचतं करण्याचा ध्यास घेतला आहे. 

गेल्या वर्षी पुस्तकदिनी म्हणजे २३ एप्रिल २०१६ रोजी अमृतनं एक आगळंवेगळं अॅप सुरू केलं, बुकलेट नावाचं. सीए असलेला अमृत आठवड्याला एक पुस्तक वाचतो. त्या पुस्तकाचा सारांश सोप्या इंग्रजीमध्ये लिहितो आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर दर बुधवारी टाकतो. तो सारांश साधारण २० मिनिटांत वाचून संपेल असा असतो. बघता बघता हजारोंच्या संख्येने वाचक त्याच्या या ‘बुकलेट’ उपक्रमात सहभागी होऊ लागले. व्हॉट्सअॅपवरून हे करण्याला असलेली मर्यादा लक्षात घेऊन अमृतनं बुकलेट अॅप सुरू केलं.
एवढंच करून अमृत थांबला नाही, तर ‘जास्त आळशी’ किंवा ‘जास्त बिझी’ या गटात मोडणाऱ्यांसाठी त्यानं लिहिलेल्या सारांशाचे वाचन करून त्याचा ऑडिओदेखील अॅपवर, फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. गाडी चालवताना, व्यायाम करताना इअर फोन लावायचे आणि ऐकायचं एखादं पुस्तक. ट्रेलरमध्येच अख्खा सिनेमा बघायला मिळण्याइतकं सुख असणार त्यात. सध्या अमृत इंग्रजी, बेस्ट सेलर ठरलेल्या पुस्तकांची निवड करत आहे. यामार्फत भारतातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर वाचनाशी जोडला जात आहे.
अमृतला या उपक्रमामधून भारतीय तरुणांना वाचायला लावायचे आहे. सध्या तरुण फेसबुकवर शेअर झालेले फुटकळ विनोद, येणारे मेसेज आणि फार तर बातम्या यापलीकडे काही वाचत नाही. तरुणांच्या वाचनाला अर्थ असावा, काही तरी दर्जेदार त्यांच्या वाचनात यावं यासाठी अमृतनं हा उपक्रम सुरू केला आहे. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, अशी चर्चा करत बसण्यापेक्षा ती संस्कृती पुन्हा बहरावी यासाठी अमृतनं राबवलेला हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे.
 
15 7 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search