Next
बायोपिकच्या लाटेत छगन भुजबळही..
‘परोपकारी नेता’ चित्रपटाचा शुभारंभ
BOI
Thursday, April 11, 2019 | 06:09 PM
15 0 0
Share this article:

छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘परोपकारी नेता’ या चित्रपटाच्या शुभारंभप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक शिवम लोणारी यांच्यासह करण जाधव, प्रसन्न जोगदेव, अर्जुन प्रधान आदी मान्यवर.

पुणे : सध्याच्या बायोपिकच्या लाटेत आणखी एक नाव सामील झाले आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे. शिवलीला फिल्म्सच्या वतीने छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘परोपकारी नेता’ हा चित्रपट निर्माण करण्यात येत आहे.      

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून, या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. या चित्रपटात करण जाधव, प्रसन्न जोगदेव, अर्जुन प्रधान हे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत असून, शिवलीला फिल्म्सचे शिवम लोणारी यांनी चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच दिग्दर्शन आणि लेखनाची बाजू सांभाळली आहे. लोणारी यांच्याबरोबर सुरज कदम, चिंतन मोकाशी संवाद लेखन करत आहेत. चित्रपटाचे संगीत मानस माळी यांचे असून, वेशभूषा कीर्ती जंगम यांची आहे. कला दिग्दर्शन शंतनू कुलकर्णी करणार असून, ग्राफिक्स व व्हीएफएक्सची जबाबदारी विराज पंध्ये सांभाळणार आहेत. नीरज वळसंगकर आणि प्रतिक जोशी हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, वळसंगकर संकलनाची जबाबदारी पार पाडणार आहेत 

‘आमदार छगन भुजबळ यांचा बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे निर्माते-दिग्दर्शक शिवम लोणारी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘छगन भुजबळ एक राजकारणी म्हणून लोकांना परिचित आहेत, परंतु या चित्रपटातून त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू, त्यांची जडणघडण, संघर्ष तसेच त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व भुजबळ कुटुंबीयांचा पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला मिळत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई आणि नाशिक याठिकाणी करणार असून, नऊ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा    मानस आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search