Next
‘ऊर्जा विभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावणार’
प्रेस रिलीज
Monday, September 11, 2017 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

रामदास तडसवर्धा : ऊर्जा विभागातर्फे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावणार असल्याचे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार रामदास तडस यांना दिले.

ऊर्जा विभागातर्फे २६ मार्च २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे वाटप करण्यासाठी आदेश झाला आहे. या निर्णयानुसार वीज कंपनीतील देखभाल दुरुस्तीची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून (स्थापत्य व विद्युत) लॉटरी करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरून लोकसभा क्षेत्रातील अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी नोंदणी करण्यासाठी ऊर्जा विभागाकडे अर्ज केला. बेरोजगार अभियंत्यांनी नोंदणी करण्यासाठी दोन वर्षांसाठी ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारले जात आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्राम विकास विभाग सुशिक्षित बरोजगार अभियंत्यांना १० वर्षांसाठी अत्यंत कमी दारात म्हणजेच १० हजार रुपयांत नोंदणी प्रदान करीत असल्याचे लक्षात आले.

या अभियंत्यांवर आर्थिक भुर्दंड पदत असल्यामुळे ही तफावत दूर करावी म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले; तसेच स्वतः मंत्रालयात भेट घेऊन ऊर्जा विभागाशी प्रस्तावित केलेली ३० हजार रुपये नोंदणी शुल्क कमी करावे, अशी मागणी केली. यावर त्वरित कार्यवाही करत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी ऊर्जा विभागाचे मुख्य विद्युत निरीक्षक श्री. बागडे यांना दूरध्वनी करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या व सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग प्रमाणेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून नोंदणी शुल्क प्रस्तावित करावे, असे आदेश दिले.

या कार्यवाहीमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग प्रमाणेच ऊर्जा विभागातही अत्यंत माफक शुल्कात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कंत्राटदार नोंदणी मिळेल व पर्यायाने अनेक युवकांना स्वयंरोजगार प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करून खासदार तडस यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search