Next
फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’तर्फे वारकरी सेवा
BOI
Saturday, June 29, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:


पुणे : फिनोलेक्स उद्योग समूह आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, फराळ वाटप व पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

यामध्ये दिघी, लोणी, सासवड येथे आरोग्य शिबीर व फराळ-पिशव्यांचे वाटप झाले. दोन्ही संतांच्या पालखी मार्गावर उरुळी कांचन, नीरा, लोणंद, तरडगाव, फलटण, बारामती, इंदापूर, अकलूज, पिराची कुरोली, वाखरी येथे वारकऱ्यांची सेवा झाली. या उपक्रमात यशस्वितेत निलेश घुले, अविनाश बामणीकर, आशिष कुलकर्णी, कल्याण गोफणे, संतोष शेलार यांनी मोलाचे योगदान दिले. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोग्य शिबिरातून वारकऱ्यांची सेवा केली.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search