Next
महिंद्राची नवी बोलेरो ‘भारत-सहा’ निकषांवर पात्र
BOI
Saturday, July 27, 2019 | 03:15 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा या देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीच्या ‘बोलेरो पॉवरप्लस’ या वाहनाने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वाहनांना आवश्यक असलेल्या भारत -सहा निकषांची पूर्तता केली आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नालॉजीकडून (आयसीएटी) ‘बोलेरो पॉवरप्लस’ला याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतात कार्बन उत्सर्जनाबाबतचे नवीन ‘भारत-सहा’ निकष लवकरच लागू करण्यात येणार आहेत. 


पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही नवी बोलेरो दाखल होणार असून, विशिष्टकालावधीमध्ये सर्व उत्पादनांमध्ये या  तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी कंपनी तयारी करत आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांच्या मते, ‘भारत-सहा निकषांच्या तयारीच्या दृष्टीने पहिला मैलाचा टप्पा म्हणून, आम्हाला ‘बोलेरो पॉवरप्लस’साठी हे प्रमाणपत्र मिळाल्याचा अतिशय आनंद होत आहे. बोलेरो ही आमची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे आणि आयसीएटीने ‘बीएस-सहा’ साठी सज्ज असल्याचे प्रमाणित केलेली ती पहिली युटिलिटी व्हेइकल आहे.’

याबरोबरच, महिंद्राने बोलेरो या महत्त्वाच्या उत्पादनाच्या सुरक्षेच्याबाबतीत सुधारणा केली असून, नव्या सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी आता बोलेरोमध्ये एअरबॅग व अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस), स्पीड अलर्ट सिस्टीम, सीट बेल्ट रिमांइडर, सेंट्रल लॉकिंग सिस्टीमसाठी मॅन्युअल ओव्हरराइड, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स अशा विविध  वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search