Next
‘प्रदर्शनामुळे महिलांच्या कलेला व्यासपीठ’
‘लायन्स क्लब ऑफ पूणे सारसबाग’तर्फे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 12:48 PM
15 0 0
Share this article:

हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना दिलीप बंड व डॉ. सुनीता बंड. शेजारी फतेचंद रांका, आशा ओसवाल, प्रवीण ओसवाल आदी मान्यवर.

पुणे : ‘महिलांकडे ‘मल्टिटास्किंग’चे कौशल्य असते. घरचा व्याप सांभाळून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून आपल्यातील कला त्या जोपासत असतात. त्यांच्या या कलेला व्यासपीठ देण्यासाठी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. लायन्स क्लबने हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करून या महिलांना आपली कला दाखविण्याची संधी दिली आहे,’ असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे ओसवाल भवन येथे महिलांनी स्वतः बनविलेल्या हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन दिलीप बंड व त्यांच्या पत्नी डॉ. सुनीता बंड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘मिसेस इंडिया २०१८’ डॉ. पल्लवी प्रसाद, क्लबचे मार्गदर्शक फत्तेचंद रांका, अध्यक्ष प्रवीण ओसवाल, आशा ओसवाल, सचिव संतोष पटवा, खजिनदार दीपा गांधी, सदस्या चैताली पटनी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बंड म्हणाल्या, ‘प्रदर्शनात महिलांनी बनवलेल्या वस्तू खूपच सुदंर आणि दर्जेदार आहेत. अतिशय बारकाईने आणि कलाकुसरीने या वस्तू तयार केल्या आहेत. त्यांच्यातील कलाकाराची मेहनत या वस्तूंमधून दिसत आहे.’

समाजीतील गरजू, वंचित रुग्णांना मोफत डायलेसिस करता यावे, यासाठी या प्रदर्शनातून निधी संकलन केले जाते. प्रदर्शनात जवळपास १५० स्टॉल्स उभारण्यात आले असून, यामध्ये घरातील सुशोभित वस्तूंपासून ते कपडे, हाताने बनविलेले कलाप्रकार, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे. बंड दाम्पत्याने प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंची पाहणी करून महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.

क्लबच्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना मोफत डायलिसिस सुविधा मिळावी, या हेतूने गेल्या पाच वर्षांपासून लायन्स क्लब पुणे सारसबाग हा उपक्रम राबवित असल्याचे रांका यांनी सांगितले.

फोटो ओळ :
हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना दिलीप बंड व डॉ. सुनीता बंड. शेजारी फतेचंद रांका, आशा ओसवाल, प्रवीण ओसवाल आदी मान्यवर.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search