Next
‘लँड रोव्‍हर’तर्फे भारतात ‘दी अबव्‍ह अॅंड बियाँड टूर’ची घोषणा
प्रेस रिलीज
Saturday, April 13, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : ‘जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया’ने ‘दी अबव्‍ह अॅंड बियाँड टूर’ची घोषणा केली. १२ एप्रिल २०१९ रोजी अहमदाबादमध्‍ये पहिला इव्‍हेंट झाला असून, टूर भारतातील अनेक शहरांमध्‍ये प्रवास करेल आणि ‘लँड रोव्‍हर’च्‍या ग्राहकांना सुरक्षित, व सर्वसमावेशक पद्धतीने ऑफ-रोड ड्राइव्‍हचा अनोखा अनुभव देणार आहे.

या विषयी बोलताना ‘जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया’चे (जेएलआरआयएल) अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले, ‘वर्षानुवर्षे लँड रोव्‍हर इव्‍हेंट्स लोकप्रिय होत चालले आहेत. आमच्‍या ग्राहकांना त्‍यांच्‍या जीवनात कायमस्‍वरूपी स्‍मरणात राहिल असे अनुभव देण्‍याच्‍या माध्‍यमातून ‘लँड रोव्‍हर’ची ओळख करून देण्‍याचे हे परिपूर्ण व्‍यासपीठ आहे.’



अष्‍टपैलू डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट आणि अत्‍यंत स्‍टायलिश रेंज रोव्‍हर इवोकमधील उच्‍च प्रशिक्षित ‘लँड रोव्‍हर’ मार्गदर्शकांच्‍या टीमने ‘दी अबव्‍ह अॅंड बियाँड टूर’चे आयोजन केले आहे. भारतात २०१३मध्‍ये ‘लँड रोव्‍हर’ ड्राइव्‍हचा अनुभव देणाऱ्या पहिल्‍या इव्‍हेंटचे आयोजन केले होते आणि तेव्‍हापासून १८ हजारांहून अधिक लोकांना संस्‍मरणीय अनुभव देण्‍यात आला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search