Next
‘मिशन २०१९ महिला मुख्यमंत्री’साठी जनजागृती
नागरिक अधिकार मंचाचा (नाम) पुढाकार
मिलिंद जाधव
Thursday, January 03, 2019 | 12:01 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राजकारणातील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी तीन ते १२ जानेवारी २०१९ या कालावधीत म्हणजेच सावित्रीबाई जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती या दरम्यान सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १३८ नंबर बस थांब्याजवळ जनजागृती सह्ंयाची मोहीम राबविण्यात येणार आहे. यात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला असावी अशी मागणी केली जाणार आहे.

ही मोहीम नागरिक अधिकार मंचातर्फे (नाम) ‘मिशन २०१९ महिला मुख्यमंत्री’ या अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. १२ जानेवारीपर्यंत मुंबईतील विविध महाविद्यालये आणि रेल्वे स्टेशन परिसरात सलग ही मोहीम राबविली जाईल. या मोहिमेत सिद्धार्थ कॉलेजचे एनएसएस युनिट आपला सहभाग देत आहे.

जेंडर गॅप रिपोर्ट २०१७ नुसार १४४ देशांच्या सूचीमध्ये भारताला १०८ वे स्थान देण्यात आले आहे. हे अत्यंत अपमानास्पद आहे. ‘मिशन २०१९ पहिली महिला मुख्यमंत्री’ या अभियानाच्या माध्यमातून भारताची ही जागतिक प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी विधानसभेत व लोकसभेत एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची मागणी केली जाणार आहे. त्यासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे ‘नाम’ने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या वेळी शिवाजी पार्क येथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या  आठ हजार महिलांनी स्वाक्षरी करून ‘मिशन २०१९ महिला मुख्यमंत्री’ अभियानाला सहमती दर्शवली. या वेळी १०० कार्यकर्ते सहभागी होते.

या प्रसंगी बोलताना अमोल मडामे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत महिला महाराष्ट्र प्रमुखपद म्हणजेच मुख्यमंत्रीपद भूषवू शकली नाही. देशातील इतर राज्यांना महिला मुख्यमंत्री मिळाल्या; पण महाराष्ट्र अजूनही प्रतीक्षेत आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मानाने मिरविणाऱ्या राज्याला नक्कीच हे भूषणावह नाही. ६० वर्ष होऊनसुद्धा राज्याला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा ठोस करण्यासाठी ‘मिशन २०१९ महिला मुख्यमंत्री’ या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने महिलांचे एकंदरीत भारतीय राजकारणातील प्रतिनिधित्व वाढविणे हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच या अभियानाच्या माध्यमातून महिलांचे, राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व ५० टक्क्यांपर्यंत वाढविणे, त्यांचे मानसिक परिवर्तन घडवून आणणे व पुरुषप्रधान राजकारणाचा पोत बदलण्यासाठी कार्यरत असणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr. Varsha Ramchandra Choure About 231 Days ago
Great initiative by the team for ladies
0
0

Select Language
Share Link
 
Search