Next
शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब
‘जेएसपीएम’ व ‘टाटा’मध्ये सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Monday, June 10, 2019 | 12:01 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय व टाटा ऑटोमेशन लिमिटेड, पुणे यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागांमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबची स्थापना करण्यात आली आहे. 

संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन राष्ट्रीय मुल्यांकन संस्था अर्थात ‘एनबीए’चे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल व इनप्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन श्रीकृष्ण करकरे यांच्या हस्ते करण्यात आले. रोबोटिक्स लॅबच्या उभारणीसाठी संकुल संचालक रवी सावंत व सुधीर भिलारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या लॅबच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व ऑटोमेशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, या मार्फत रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अविनाश बडदे यांनी दिली. 

‘महाविद्यालयास नुकतीच शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून, नव्याने तयार होणाऱ्या अभ्यासक्रमात टाटा कंपनीच्या तंत्रज्ञानचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. यांत्रिकी विभागात अशाच प्रकारच्या इतर अत्याधुनिक लॅब प्रस्थापित करण्यात येणार असून, यासाठी भारतातील अग्रगण्य कंपन्यांसोबत करार करण्यात येणार आहेत,’ असे प्राचार्य डॉ. जैन यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search