Next
कांदळी येथे महिलांना गॅस संचाचे वाटप
BOI
Monday, July 15, 2019 | 01:23 PM
15 0 0
Share this article:

पडघा येथे गॅस संचाचे वाटप करताना मान्यवर.

पडघा : भिवंडी तालुक्यातील कांदळी व बोरीवली जिल्हा परिषद गटातील गरीब महिलांना श्री मीनाक्षी फाउंडेशनतर्फे गॅस संचाचे वाटप करण्यात आले.

शिवसेना शहापूर भिवंडी मुरबाड संपर्कप्रमुख व श्री मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गॅस संचाचे व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम १४ जुलैला कांदळी आयोजित करण्यात आला होता. यात १५० गरीब महिलांना गॅस व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, शहापूर तालुकाप्रमुख मारुती धीर्डे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधव, समाजकल्याण सभापती संगीता गांगड, महिला व बालकल्याण सभापती सपना भोईर, समाजकल्याण न्यास अध्यक्ष सोन्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास पाटील, सचिव मनोहर ठाकरे, उद्योजक सुभाष कथोरे, रवींद्र विशे, राजेश फाफे, सरपंच रोहिणी चंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती वैशाली चंदे यांचा सत्कार करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search