Next
‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर
प्रत्येक मुलाचा ६० टक्के खर्च बँकेतर्फे
BOI
Thursday, March 14, 2019 | 03:50 PM
15 0 0
Share this story


मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने त्यांच्या मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसच्या परिसरात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघर सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा देणारी ही देशातली पहिली बँक आहे. महिला दिनाचे औचित्य साधून बँकेच्या या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. 

‘वरिष्ठ पदांवर महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे,’असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  पी. एस. जयाकुमार यांनी सांगितले.  


ते पुढे म्हणाले, ‘पाळणाघराशिवाय इतरही बरेच उपक्रम बँकेतर्फे राबवले जात असून, त्यामागे नोकरदार स्त्रिया आणि पालक अशा सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. पूर्णवेळ नोकरी आणि पालकत्व या दोन्हीचा समतोल साधण्याचा जागतिक ट्रेंड बँक ऑफ बडोदा आपलासा करत आहे. या उपक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांना वेळ आणि पैशांची बचत करता येणार आहे. सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे पाळणाघर असेल. मुलांसाठी योग्य पाळणाघर मिळाल्याने महिला वर्ग निश्चिंतपणे काम करू शकेल. त्यांची कामगिरी उंचावण्यास मदत होईल.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link