Next
शिवाजी विद्यापीठामध्ये ‘संगीतरस आस्वाद’ कार्यशाळा
BOI
Wednesday, June 19, 2019 | 02:05 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : संगीतातील संकल्पना समजून त्याचा निव्वळ आनंद घेता यावा या उद्देशाने राष्ट्रीय संगीत दिनानिमित्त (२१ जून) विद्यापीठातील लोकविकास केंद्र आणि संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संगीतरस आस्वाद’ या तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २० ते २२ जून या कालावधीत दुपारी दोन ते पाच या वेळेत लोकविकास केंद्रात होईल.

या कार्यशाळेत विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागप्रमुख व ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. अंजली वसंत निगवेकर या मार्गदर्शन करणार आहेत. यात त्या विविध प्रकारचे संगीत प्रवाह, संकल्पना, तसेच त्यामधील साम्य व फरक आणि त्यातील गोडवा, त्याचबरोबर संगीताचे विविध पैलू (स्वर, ताल, स्वरसंगती, स्वरमाधुर्य आणि स्वरसंवाद) यांविषयी माहिती देणार आहेत. 

इच्छुकांनी कार्यशाळेत सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन विद्यापीठकडून करण्यात आले आहे.

कार्यशाळेविषयी :
कालावधी : २० ते २२ जून २०१९ 
वेळ : दुपारी दोन ते पाच 
स्थळ : लोकविकास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 
सहभागासाठी संपर्क : लोकविकास केंद्र- (०२३१) २६०९३०९
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search