Next
‘पटवर्धन’च्या मासिक संगीत सभेत माला पाथरेंचे सतारवादन
BOI
Thursday, February 28, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this story



रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीची १५७वी मासिक संगीत सभा गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या कीर हॉलमध्ये उत्साहात झाली. ही सभा माला पाथरे यांच्या सतारवादनाने रंगली.

मैफलीची सुरुवात पाथरे यांनी राग पुरिया कल्याण सादर केला. विलंबित तीनतालानंतर द्रुत तीनताल सादर केला. त्यानंतर राग श्याम कल्याण द्रूत लय तीन तालात अतिशय सुंदर सादर केला. मैफलीची शेवट भैरवी सादर करून झाला. या मैफलीला कोल्हापूर येथील प्रशांत देसाई यांची तबला साथ केली.

फेब्रुवारी महिन्यातील ही मैफल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष अरुअप्पा जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सादर केली जाते. या मैफलीला रत्नागिरी रिफीयनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांचे प्रायोजक लाभले आहे. ही मैफल यशस्वी होण्यासाठी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, जांभेकर विद्यालय, महेश नाईक, शालेय समिती अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता, मानद संचालक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचे सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link