Next
दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना ‘प्लेक्स टॉक’चे मोफत वाटप
दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनमध्ये विशेष कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, April 25, 2019 | 11:48 AM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपुणे : गेली ५७ वर्षे दृष्टिबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणार्‍या दी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (दी पीबीएमए) या सामाजिक संस्थेच्या टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे नुकतेच महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या २०० दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना असिस्टिव्ह डिव्हाइसेसचे (प्लेक्स टॉक) वाटप करण्यात आले.

असिस्टिव्ह डिव्हाइस योजना ही केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत असून, सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ व्हिजुअल डिसेबिलिटी (एनआयईपीव्हीडी) यांच्या सहयोगाने राबविली जाते. या योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी पुण्यात रामटेकडी, हडपसर येथील ‘दी पीबीएमए’चे टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्यवर्ती केंद्र असून, महाराष्ट्रभरातील विद्यार्थी येथे येऊन या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करतात. नोंदणी झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ व्हिजुअल डिसेबिलिटीतर्फे (एनआयईपीव्हीडी) केली जाते आणि त्यानंतर असिस्टिव्ह डिव्हाइसेसचे वितरण होते.


सन २०१४पासून आतापर्यंत स्मार्टकेन, सीडी प्लेयर्स, स्मार्टफोन व रेकॉर्डिंग डिव्हाइसेस यांसारखी सुमारे ७९ लाख रुपये किंमतीची उपकरणे केंद्र सरकारच्या या असिस्टिव्ह डिव्हाइसेस फॉर इम्पेअर्ड पर्ससन्स (एडीआयपी) योजनेअंतर्गत दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना मोफत दिली आहेत. अनेक दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना या असिस्टिव्ह डिव्हाइसेसचा अतिशय उपयोग झाला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search