Next
सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत
BOI
Saturday, August 17, 2019 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

सारस्वत बँकेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश देताना (डावीकडून) बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, शशिकांत साखळकर, किशोर रांगणेकर, देवेंद्र फडणवीस, हेमंत राठी, स्मिता संधाने व अजयकुमार जैन

पुणे : सहकार क्षेत्रातील अग्रणी सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटी रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपुर्द  केला. बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर, संचालक हेमंत राठी, कार्यकारी संचालिका स्मिता संधाने व मुख्य महाव्यवस्थापक अजयकुमार जैन या वेळी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा आणि कोल्हापूरसह कोकण, उत्तर महाराष्ट्रातील भागांना महापूराचा मोठा  फटका बसला आहे. यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले, तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पूर ओसरल्यानंतर या भागांचे पुनर्वसन करण्यासाठी व जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासन आणि अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. 

‘सारस्वत बँक महाराष्ट्राची हक्काची बँक असून, बँकेने यापूर्वीही आपत्तीजनक परिस्थितीमध्ये योगदान दिले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना बँकेत नोकरी देऊन त्यांना आधार देण्यात आला होता. समाजाचे ऋण फेडण्याची सामाजिक बांधिलकीची भावना सारस्वत बँकेने कायम जपली असून, पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा बँकेने पाऊल उचलले आहे,’ अशी भावना संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search