Next
जिद्द आणि चिकाटीच यश मिळवून देऊ शकते : विश्वास नांगरे-पाटील
BOI
Wednesday, April 12, 2017 | 06:24 PM
15 1 0
Share this article:

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विश्वास नांगरे-पाटीलपुणे : ‘जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित यश मिळवता येऊ शकते. सातत्य व परिश्रमाच्या बळावर यश खेचून आणता येते,’ असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मांडले.  स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पुण्यातील नऱ्हे येथील झील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. झील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक जयेश काटकर यांनी विश्वास नांगरे-पाटील यांचा सत्कार केला. काटकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व झील एज्युकेशन सोसायटीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. झील एज्युकेशन सोसायटीने एका वर्षापूर्वी सुरू केलेल्या ‘लक्ष्य स्टडी सेंटर’च्या माध्यमातून सचिन थोरबोले व सचिन वैद्य या दोन विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेमध्ये यश मिळवले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला.

आपल्या ‘येस यू कॅन’ या विषयावरील व्याख्यानात पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ‘वेळेचे नियोजन करा व ध्येयाचा जिद्दीने व चिकाटीने पाठपुरावा करावा,’ असा सल्ला त्यांनी दिला. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणेही दिली. ‘पोलीस विभाग सक्रिय करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी सहकार्य केले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांना विविध सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचाही विकास व्हावा याबद्दल आपण आग्रही आहोत, हेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टिकम शेखावत यांनी विश्वास नांगरे पाटील यांना सूचक प्रश्न विचारून मुलाखतवजा चर्चा केली. या प्रश्नांना पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत उत्तरे दिली.

हा कार्यक्रम ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता. या माध्यमातून कार्यक्रमात राज्याच्या विविध भागांतील सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय देवकर यांनी केले होते.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search