Next
'राष्ट्रवादी'तर्फे लोकसभा जिल्हाध्यक्ष्यांच्या नियुक्त्या
प्रेस रिलीज
Thursday, September 20 | 04:43 PM
15 0 0
Share this story

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन २०१८-२०२० पक्षांतर्गत निवडणुका पार पडल्या असून, यामधील दोन लोकसभा जिल्हाध्यक्ष आणि तीन कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी जाहीर केल्या.

प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष, तर पनवेल शहर, लातूर ग्रामीण यासाठी कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून कोंडाजी आव्हाड यांची, तर कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे यांची नियुक्ती केली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे (मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य, बागलाण विधानसभा मतदारसंघासह) अध्यक्ष म्हणून रवींद्र पगार, तर कार्याध्यक्षपदी डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल शहरासाठी कार्याध्यक्ष म्हणून शिवदास कांबळे आणि लातूर ग्रामीण कार्याध्यक्षपदी डॉ. अफसर शेख यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

या सर्व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे आणि कार्याध्यक्षांचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link