Next
‘शिबदरा गावासाठी निधी कमी पडू देणार नाही’
आमदार नागेश पाटील व नगराध्यक्ष कुणाल राठोड यांचा नागरी सत्कार
नागेश शिंदे
Friday, August 31, 2018 | 12:36 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
तालुक्यातील मौजे शिबदरा येथील मंदिर बांधकामासाठी व गावातील विविध विकास कामांसाठी १४ लाख ५० हजार रुपयांचा निधी हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी उपलब्ध करून दिला. 

शिबदरा येथील ग्रामस्थांच्या वतीने ३० ऑगस्ट २०१८ रोजी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचा, तसेच हिमायतनगरचे नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांचा नागरी सत्कार झाला. त्या वेळी पाटील-आष्टीकर म्हणाले, ‘शिबदरा गावासाठी मी निधी कमी पडू देणार नाही. शिबदरा येथील जनतेचे माझ्यावर मोठे उपकार असून, तत्कालीन आमदार बापूराव पाटील-आष्टीकर यांच्या कार्यकाळापासून आमच्यावर प्रेम करणारी येथील जनता आजही आमच्या वर तेवढेच प्रेम करते. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी विधानसभेवर काम करत आहे. मी शिबदरा येथील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गावाच्या विकासाच्या कामासाठी १४ लाख ५० हजार रुपयांचा निधी देणार आहे.’ कार्यक्रमावेळी त्यांनी शिबदरा ग्रामस्थांना मंदिर बांधकामासाठी तत्काळ साडेसात लाखांचा निधी दिला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. सदाशिव महाराज होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राम राठोड, राजू बंडेवार, नगरसेवक विनायक मेंडके, सरपंच संजय काईतवाड, अरविंद पाटील सिरपल्लीकर, बंडू पाटील आदी उपस्थित होते. त्यांच्यासह सरपंच प्रकाश भदेवाड, गजानन चायल, नगरसेवक विनायक मेंडके, राजू पाटील, सरपंच अरविंद वानखेडे, युवासेना उपतालुका प्रमुख लखन जैस्वाल, परमेश्वर बाचकलवड, अभिलाष जयस्वाल आणि शिबदरा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search