Next
हिंदुगर्जना चषक मुन्ना झुंजुरकेकडे
BOI
Tuesday, February 13 | 04:53 PM
15 0 0
Share this story

मुन्ना झुंजुरके याचा सन्मान करताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया, स्पर्धेचे आयोजक धीरज घाटे आणि मान्यवर.

पुणे :
हिंदुगर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित ‘हिंदुगर्जना चषक २०१८’ कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात मुळशीचा तानाजी ऊर्फ मुन्ना झुंजुरके याने मानाचा ‘हिंदुगर्जना चषक’ जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने शिरूरच्या सचिन यलभर याचा गुणांच्या जोरावर पराभव केला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा, एक लाख रुपयांचा धनादेश, विजेतेपदासाठीचा हिंदुगर्जना चषक आणि बुलेट अशी पारितोषिके देऊन विजेत्या तानाजी ऊर्फ मुन्ना झुंजुरके याचा सन्मान करण्यात आला. उपविजेत्या सचिन यलभर याला ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय स्थानी राहिलेल्या पुणे शहरातील तेजस वांजळे याचा गौरव २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

सचिन दाताळ याचा गौरव खास कोल्हापूरहून आलेले माजी हिंदकेसरी पैलवान दीनानाथ सिंह, माजी महाराष्ट्र केसरी नामदेवराव मुळे आणि पैलवान बाबासाहेब राजे महाडिक, तसेच माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

‘हिंदुगर्जना चषक’ स्पर्धेतील कुमार गटाचा विजेता हवेलीचा सचिन दाताळ ठरला. २५ हजार रुपयांचा धनादेश, हिंदुगर्जना चषक आणि मानाची चांदीची गदा देऊन त्याला गौरविण्यात आले. द्वितीय स्थानी राहिलेल्या मुळशीच्या पार्थ कंधारे याला दहा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. तृतीय स्थानी राहिलेल्या भोरच्या शुभम शेटे याला सात हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ‘हिंदुगर्जना चषक २०१८’ स्पर्धेच्या निमित्ताने पाच लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके वितरित करण्यात आली. चौदा वर्षांखालील गटातील विविध विजेत्यांना सायकली देऊन गौरविण्यात आले. 

पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक आणि हिंदुगर्जना प्रतिष्ठान, तसेच साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. १० आणि ११ फेब्रुवारीला सारसबागेजवळील सणस स्पोर्टस् ग्राउंड येथे या स्पर्धा पार पडल्या. पुणे आणि परिसरातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला. 

तानाजी ऊर्फ मुन्ना झुंझुरके.

पुण्यनगरीच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, राष्ट्रीय नौकानयन महामंडळाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेविका स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, वर्षा तापकीर, मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेविका मनीषा घाटे, नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, हेमंत रासने, महेश लडकत, महेश वाबळे, दीपक पोटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर आणि पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लावली. 

विजेत्यांसोबत आयोजक धीरज घाटे.

पहिलवानांचा गौरव
महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांची छत्रपती शिवाजी महाराज आखाड्यात ‘एंट्री’ झाली तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याने मैदानात फेरी मारून उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केले. कटके आणि भगत यांना मानाची तलवार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. बाळासाहेब लांडगे, माजी महाराष्ट्र केसरी विकी बनकर आणि माजी ऑलिंपिकपटू काका पवार यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. स्पर्धा पाहण्यासाठी खास कोल्हापूरहून माजी हिंदकेसरी पैलवान दीनानाथ सिंह, माजी महाराष्ट्र केसरी नामदेवराव मुळे आणि पैलवान बाबासाहेब राजे महाडिक आदी मंडळी उपस्थित होते. त्यांनीही स्पर्धेच्या आयोजनाबद्दल खूप समाधान व्यक्त केले आणि उपस्थित मल्लांना शुभेच्छा दिल्या. 

फेसबुकवरून लाइव्ह
‘हिंदुगर्जना चषक २०१८’ स्पर्धेच्या दोन्ही दिवसांच्या खेळाचे ‘फेसबुक लाइव्ह’ करण्यात आले होते. त्यामुळे फक्त पुण्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात आणि जगभरात या स्पर्धेचा आस्वाद घेतला गेला. दोन्ही दिवस तुतारी आणि हलगी यांच्या माध्यमातून जबरदस्त वातावरण निर्मिती करण्यात आली होती. बाबाजी निम्हण यांच्या ओघवत्या आणि वातावरण भारावून टाकणाऱ्या धावत्या समालोचनामुळे स्पर्धेतील रंगत अधिकच वाढली. 

सविस्तर निकाल :
चौदा वर्षांखालील
३२ किलो : प्रथम क्रमांक : आदित्य शिंदे (मावळ), द्वितीय : शिवराज पायगुडे (हवेली), तृतीय : अमोल कऱ्हे (शिरूर)
३५ किलो : प्रथम क्रमांक : संग्राम दसवडकर (वेल्हा), द्वितीय : आदेश कांबळे (हवेली), तृतीय : श्रेयस खोपडे (पुणे शहर)
३८ किलो : प्रथम क्रमांक : तेजस कुमकर (हवेली), द्वितीय : अभिजित शिंदे (मुळशी), तृतीय : सुजल वाळुंज (मावळ)
४१ किलो : प्रथम क्रमांक : अभिषेक हिंगे (मावळ), द्वितीय : अक्षय भोसले (पुणे), तृतीय : आदित्य माचुद्रे (पिंपरी-चिंचवड)
४५ किलो : प्रथम क्रमांक : निनोद धायगुडे (पुणे शहर), द्वितीय : हृषीकेश काळे (इंदापूर), तृतीय : श्री. जाधव (पिंपरी-चिंचवड)

सतरा वर्षांखालील
४९ किलो : प्रथम क्रमांक : विपुल आडकर (मावळ), द्वितीय : संकेत सणस (भोर), तृतीय : अजय फुलपगर (शिरूर)
५४ किलो : प्रथम क्रमांक : करण फुलमाळी (हवेली), द्वितीय : सनी केदारी (मावळ), तृतीय : अभिजित शेडगे (वेल्हा)
६१ किलो : प्रथम क्रमांक : सचिन दाताळ (हवेली), द्वितीय : पार्थ कंधारे (मुळशी), तृतीय : शुभम शेटे (भोर)

वरिष्ठ गट
५७ किलो : प्रथम क्रमांक : किरण शिंदे (बारामती), द्वितीय : विशाल तोरवे (खेड), तृतीय : स्वप्नील भरम (वेल्हा)
६१ किलो : प्रथम क्रमांक : सागर मारकड (इंदापूर), द्वितीय : भालचंद्र कुंभार (पुणे शहर), तृतीय : अशोक बंडगर (इंदापूर)
६५ किलो : प्रथम क्रमांक : नामदेव कोकाटे (इंदापूर), द्वितीय : निखिल कदम (पुणे शहर), तृतीय : अनिल कचरे (इंदापूर)
७० किलो : प्रथम क्रमांक : तुकाराम शितोळे (पुणे शहर), द्वितीय : शुभम थोरात (हवेली), तृतीय : अरुण खेंगले (खेड)
७४ किलो : प्रथम क्रमांक : अक्षय चोरघे (पुणे शहर), द्वितीय : बाबू डोंबाळे (इंदापूर), तृतीय : दिनेश मोकाशी (बारामती)

खुला गट
प्रथम क्रमांक : तानाजी उर्फ मुन्ना झुंजुरके (मुळशी)
द्वितीय क्रमांक : सचिन यलभर (शिरूर)
तृतीय क्रमांक : तेजस वांजळे (पुणे शहर)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link