Next
‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट’चा फॅशन शो उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, March 05, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीतर्फे आयोजित ‘ल क्लासे’ फॅशन शो नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्स आणि मॉडेल्सनी केलेले त्याचे उत्कृष्ट सादरीकरण यांमुळे या फॅशन शोने उपस्थितांची मने जिंकली. फॅशन शोचे हे आठवे वर्ष होते.

फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाइन्स आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण व्हावे, या उद्देशाने हा फॅशन शो दर वर्षी आयोजित केला जातो. या वेळी अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोषाखांचे डिझाइन्स कौतुकास्पद असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून आयोजित केलेल्या या फॅशन शोचे व्यावसायिक स्वरूपाच्या फॅशन शोप्रमाणे आयोजन केले होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या डिझाइन्स परिधान करून अनेक प्रसिद्ध मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला. यंदा विद्यार्थ्यांनी ‘न्यू स्टाइल इनोव्हेशन’ या संकल्पनेवर काम केले होते. ‘दी रेज ऑफ रॅफल्स’, ‘ड्रॅमॅटिक डिझास्टर’, ‘मिस्ट्रीयस क्रिएशन्स’, ‘दी आफ्रिकन वार्डरोब’, ‘दी इरा ऑफ १९४५’, ‘ग्लोरी गर्ल्स’, ‘अॅक्वाटिक ड्रीम्स’, ‘दी डेनिम हँगओव्हर’, ‘बंजारा- दी वन्डरिंग सोल्स’ या नऊ संकल्पनांवर हे सादरीकरण झाले.संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या शोवेळी अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशी, बँकर सुरी शांडिलिया, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रमुख आणि फॅशन शोच्या समन्वयिका प्रा. रेणुका घोसपूरकर आदी उपस्थित होते. फशन डिझाइनर संदेश नवलाखा, शलाका घैसास आणि गीता कस्तुरी यांनी ज्युरी म्हणून काम पहिले. ‘ड्रॅमॅटिक डिझास्टर’ला प्रथम क्रमांकाचे, तर ‘डेनिम हँगओव्हर’ला द्वितीय क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले.

‘दी रेज ऑफ रॅफल्स’मध्ये प्राजक्ता शिंदे, बरखा सिंग, अखिशा विभुते, ‘ड्रॅमॅटिक डिझास्टर’मध्ये प्रियांका मंत्री व निकिता सातव, ‘मिस्ट्रीयस क्रिएशन्स’मध्ये मित्तल बारवाडिया, निकिता वोरा, निकिता साळुंके, प्रतीक्षा पाटील, संतोष शहा, लावीना अनवाडिया, ‘दी आफ्रिकन वार्डरोब’मध्ये राही मोहिते, श्रुती अगरवाल, मयुरी टेकाळे, ‘दी इरा ऑफ १९४५’मध्ये कीर्ती भोपे, सिमरन चंकेश्वरा, कोमल घोडके, ‘ग्लोरी गर्ल्स’मध्ये दीक्षिता बोकाडिया, तृप्ती वलसलवार, सुकन्या म्हात्रे, ‘अॅक्वाटिक ड्रीम्स’मध्ये रूपाली भोगल, देवश्री वलसलवार, सोनाली कराड, ‘दी डेनिम हँगओव्हर’मध्ये अपूर्वा दोषी, स्नेहा नायर, रेणुका नेटके, ‘बंजारा- दी वन्डरिंग सोल्स’मध्ये प्रतीक्षा गवळी, सदिच्छा राऊत, स्वप्नाली देशपांडे यांनी कास्च्युमचे डिझाइन्स केले होते.या वेळी बोलताना प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, ‘तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी जे शिकतात, अनुभवतात, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून त्यांना प्रोत्साहित करावे, हा या फॅशन शोच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आभूषणांच्या, कपड्यांच्या डिझाइन्सचे दर्शन व्यावसायिक मॉडेल्स घडवितात. यातून डिझाईनर्सना अनेक संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

प्रा. घोसपुरकर म्हणाल्या, ‘आदिवासी, आफ्रिकन आणि बंजारा संस्कृतीवर विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. त्यासाठी डेनिम, कॅनकॅन फॅब्रिक, खण फॅब्रिक अशा प्रकारांचा यात वापर केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशन क्षेत्रात होत असलेले बदल आणि ट्रेंड्सही या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजतात.’

नुपूर पिट्टी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search