Next
राज्यात पाच दिवसांत दोन कोटींहून अधिक वृक्षलागवड
जवळपास चार लाख लोकांचा सहभाग
प्रेस रिलीज
Monday, July 08, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोमुंबई : राज्यात एक जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून, केवळ पाच दिवसांत दोन कोटी १७ लाख ८५ हजार ९६८ वृक्षांची लागवड करण्यात आली असून, यात आतापर्यंत जवळपास चार लाख लोकांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

अमरावती विभागात आतापर्यंत १८ लाख ८६ हजार ३१०, औरंगाबाद विभागात ३१ लाख ७३ हजार ७९४, कोकण विभागात ४३ लाख ७४ हजार ८८०, नागपूर विभागात २८ लाख ८८ हजार १९४, नाशिक विभागात ३४ लाख ७५ हजार ७४७ आणि पुणे विभागात ५९ लाख ८७ हजार ०४३ इतकी वृक्षलागवड झाली आहे.

यात वन विभागाने एक कोटी २० लाख ८२ हजार ०३१,  सामाजिक वनीकरण विभागाने ५६ लाख ५० हजार ९०१, वन विकास महामंडळाने सहा लाख ९२ हजार ४७१ रोपे लावली आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात आतापर्यंत १७ लाख २८ हजार ९८६ रोपे लागली आहेत. इतर विभागांनी मिळून १६ लाख ३१ हजार ५७९ वृक्षांची लागवड केली आहे. राज्यात एक जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या उद्दिष्टाच्या ६.३१ टक्के वृक्षलागवड राज्यात झाली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search