Next
मॉडर्न कॉलेजतर्फे स्वच्छता सायकल रॅली
प्रेस रिलीज
Thursday, October 04, 2018 | 04:39 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे या वर्षी ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत २० सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर २०१८ या कालावधीत सेवावस्ती व महाविदयालय परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छते विषयक माहितीपट, महाविद्यालय स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे आभार कार्यक्रम, स्वच्छता परिसंवाद, पथनाट्य, पोस्टर डिझाईन व स्वच्छता सायकल रॅली असे अनेक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
‘’
स्वच्छता पंधरवड्याचा समारोप चार ऑक्टोबर २०१८ दिवशी सकाळी ‘स्वच्छता सायकल रॅली’ने करण्यात आला. या वेळी प्रो. ए. सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, यांनी अध्यक्षस्थानी होते. रॅलीची सुरुवात नगरसेविका प्रा. डॉ. ज्योत्स्ना ग. एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

स्वच्छता हे केवळ अभियान न राहता ती लोक चळवळ  व्हावी आणि व्यक्तिगत व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासंदर्भात जनजागृतीसाठी स्वच्छता सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये २५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सर्व सायकल्सना स्वच्छता संदेश फलक लावण्यात आले होते. रॅली किमी किमी अंतराची होती.

स्वच्छता सायकल रॅलीसाठी डीसीबी बँक व मीडिया फ्युजन प्रायव्हेट लिमिटेड यांनी अर्थसाहाय्य केले. जहांगीर हॉस्पिटलतर्फे अॅम्ब्युलन्स सेवा पुरविण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit Suresh salunke About 136 Days ago
Thanks for your support and help
0
0

Select Language
Share Link