Next
सोलापूरला ऊस तोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी
आमदार बबनराव शिंदेंनी केले फराळाचे वाटप
BOI
Wednesday, November 14, 2018 | 12:06 PM
15 0 0
Share this article:

ऊस तोडणी कामगारांना फराळाचे वाटप करताना मान्यवर.

सोलापूर : माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांबरोबर दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली.

आमदार बबनराव शिंदे यांच्या या साखर कारखान्यात आमदारांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्यातील अधिकाऱ्यांनी दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या दोन दिवसांपासून साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपले घरदार सोडून ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमानिमित मजुरांना फराळाचे वाटपही करण्यात आले.

सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना मात्र हे  कामगार आपले गाव सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीसाठी आले. या कामगारांमुळेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली. या गोष्टीची जाण ठेवत या कामगारांचीही दिवाळी गोड व्हावी म्हणून आमदार शिंदे यांनी पुढाकार घेतला. गेल्या दोन दिवसांपासून साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आलेल्या ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडात जाऊन त्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. या कामगारांना दिवाळी फराळ जागेवर मिळताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता.
 
रोपळे येथे आलेल्या ऊस तोडणी कामगारांना नितीन कदम, भारत कदम, शेतकरी संघटनेचे संभाजी पवार, विलास भोसले, लक्ष्मण आदमिले, बालाजी भोसले, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, कारखान्याचे अधिकारी भीमराव कुसुमडे, चिटबॅय अरुण कोरके यांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.

या वेळी वीर गव्हाण तांडा (ता. मंठा, जि. जालना) येथून आलेले ऊस तोडणी कामगार कृष्णा राठोड यांनी दिवाळीच्या सणालाच आम्ही ऊस तोडणीसाठी आल्याने आमची दिवाळी घरी झाली नाही; मात्र दिवाळीचा फराळ घरी आल्यामुळे आमची लेकरे-बाळे खुश झाली, त्याचा आम्हाला आनंद झाल्याचे सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
nitin kadam , ropale About 191 Days ago
छाण बातमी
0
0

Select Language
Share Link
 
Search