Next
‘चिमुकलीच्या हास्याने वेगळेच समाधान दिले’
प्रेस रिलीज
Wednesday, July 11, 2018 | 05:25 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘नगरसेविका म्हणून प्रतिनिधीत्व करताना अनेक समाजकार्य, विकासकार्य करण्याची मला संधी मिळते; पण यातील काही कार्य खऱ्या अर्थाने मला समाधान मिळवून देतात. नुकताच याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम चालू असताना एका चिमुकलीला शालेय साहित्य दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर वेगळेच आनंदाचे भाव उमटले व त्यामुळे मी भारावून गेले,’ अशा भावना भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केल्या.

या वेळी शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे व प्रतिष्ठानचे अधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पद्य गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या दरम्यान आई-वडिलांसाठी विशेष प्रार्थनाही सादर करण्यात आली. प्रभागातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये बॅग, दोन वह्या, चित्रपुस्तिका, खडू व कंपास या साहित्यांचा समावेश होता.

प्रभागातील साईराज प्रतिष्ठान, विक्रम मित्र मंडळ, हिंगणे, मयुरेश मित्र मंडळ माणिकबाग, माणिकबाग फ्रेंड्स दहीहंडी उत्सव, जय शिवाजी नवरात्र उत्सव, नवनिर्माण मित्रमंडळ, समर्थनगर मित्र मंडळ, अमृतानगर मित्रमंडळ माणिकबाग, महाराजा प्रतिष्ठान, शिवपुष्प पार्क सर्कल, स्वामीसमर्थ सेवा ट्रस्ट गोल्डन ग्रुप, साईनाथ मित्रमंडळ रामनगर, माणिकबाग दत्तजयंती उत्सव, अखिल आनंदनगर ओंकार मित्रमंडळ, विठ्ठलनगर मित्रमंडळ, हिंदू साम्राज्य ग्रुप, केदार फ्रेंड्स सर्कल-४, शिवशंभो प्रतिष्ठान आनंदविहार, महालक्ष्मी नवरात्र उत्सव, हिंगणे, युनायटेड संबोधी  ऑर्गनायझेशन ट्रस्ट (अखिल सिंहगड रोड फ्रेंड्स ग्रुप) नॅशनल पार्क मित्रमंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, विठ्ठल रुखमाई मित्रमंडळ, अखिल आनंदविहार मित्रमंडळ, सिंहगड रोड सांस्कृतिक युवा मंच, श्रीराम बाल मित्रमंडळ या मंडळांद्वारेही एक ते आठ वयोगटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

प्रभागातील दत्ता करंजकर, राहुल कुदळे, मनोज गबदुल्ले, पराग कदम, दीपक कवाने, सतीश जुनागडे, प्रसाद मते, राजू कुडले, साईनाथ कदम, राहुल रूपदे, कल्पेश ओसवाल, दीपक मोटे, योगेश सोनावणे, अजिंक्य जगताप, तुषार निवंगुणे, राहुल वाळुंजकर, समीर शहाडे, समीर गेवारे, महेश काटे, शेखर व्यवारे, स्वीकार देशपांडे, नितीन साळुंखे, अमित गाडे, सिद्धेश वेल्हाळ, विजय नडगिरे, शेखर दळवी, संदीप कापरे, सागर साळुंखे, हरी राठोड, रवी निवंगुणे, सुनील दाभोळकर, श्री. माने, श्री. पांगारे, विराज बांदल, सुहास गायकवाड, सुनील भगरे, संतोष देवकर, प्रसाद मुजमले, आदर्श दहीफोळे, अक्षय निवंगुणे, वैभव पवार रोहित मसवडे, प्रसाद रेणुसे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mahendra .B.Dandavate About 239 Days ago
Very good news.Mrs.Nagpure madam working very nice.keep it up.Thanks.
0
0

Select Language
Share Link
 
Search