Next
‘स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा’
BOI
Friday, March 16, 2018 | 12:56 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘पंढरपूर शहर व मंदिर परिसरात स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे,’ असे आवाहन राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव शाम लाल गोयल यांनी केले.

गोयल यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी त्यांनी पंढरपूर शहर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

वारकरी साहित्य परिषदेतर्फे गेले तीन दिवस विठ्ठल मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता सुरू आहे. परिषदेचे ६० सदस्य या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेची पाहणीही गोयल यांनी केली.

त्यांनतर गोयल यांनी गीता गोयल, राजराणी गर्ग यांच्यासह विठ्ठलाचे दर्शन घेतले. या प्रसंगी वारकरी साहित्य परिषदे्चे अध्यक्ष विठ्ठल पाटील, प्रांताधिकारी ढोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता बळीराम नागणे, व्यवस्थापक श्री. पुदलवाड, मुख्य अभियंता एस. एन. गरांडे आदी उपस्थित होते.

या वेळी गोयल म्हणाले, ‘शेगाव येथे गजानन महाराज संस्थानतर्फे स्वयंसेवक म्हणून स्वच्छतेची सेवा देणेसाठी दोन वर्षे वाट पहावी लागते. त्या धर्तीवर पंढरपुरात मंदिर परिसर व नदीचा परिसर स्वच्छतेसाठी लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेता येईल. वारकरी साहित्य परिषदेने सुरू केलेली स्वच्छता मोहिम कौतुकास्पद आहे. केवळ स्वच्छता नाही, तर लोकांवर स्वच्छतेचे संस्कार या माध्यमातून केले जात आहेत. स्वच्छता हे एकट्याचे काम नसून ती सर्वांची जबाबदारी आहे.’

परिषदेचे विठ्ठल पाटील म्हणाले, ‘मंदिराचा परिसर धुळमुक्त, कचरामुक्त होण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यभरातून पंढरीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने येतानाच ठरविले पाहिजे, की मी पंढरपुरात स्वच्छता ठेवेन आणि विठुरायाची भूमी स्वच्छ ठेवेन.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Data Bhau - Shri Datta eregeshan shetem About
स्वच्छतेची सुरुवात पंढरीपासूनच !
0
0

Select Language
Share Link