Next
‘किफ’मध्ये ‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ला उत्तेजनार्थ पारितोषिक
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 12:43 PM
15 0 0
Share this article:

मराठीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना अमोल कचरे

कोल्हापूर : सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (किफ) २०१९ मध्ये अमोल कचरे दिग्दर्शित ‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ या माहितीपटाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. १० फेब्रुवारीला येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मराठीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते कचरे यांनी पारितोषिक स्वीकारले.

महोत्सवात शॉर्टफिल्म नॉन फिक्शन या विभागात ‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ या महितीपटाची निवड झाली होती. हा माहितीपट नाशिक येथील सुप्रिया आगाशे यांच्या कामावर बेतलेला आहे. सुप्रिया आगाशे या पर्यावरण संवर्धनासाठी गेली १५ वर्षांहून जास्त काळ सातत्याने काम करत आहेत.



या माहितीपटाचे स्क्रिप्ट कचरे व श्रद्धा कोळेकर यांनी लिहिले असून, सतीश शेंगाळे यांनी छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी पेलली आहे. ऋषिकेश कदम यांनी सबटायटल्स केली आहेत. याआधी पुण्यातील किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९मध्ये या महितीपटाची निवड झाली होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search