Next
अनुदान धनादेशाद्वारे देण्याची मागणी
BOI
Thursday, September 27, 2018 | 04:11 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : विविध योजनांखालील लाभार्थ्यांना बँकेमार्फत अनुदान दिले जात असून, ज्यांच्या अंगठ्यांचे ठसे उमटत नाहीत, त्यांना अनुदान मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक वयोवृद्ध नागरिकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना धनादेश स्वरूपात अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी हिमायतनगरचे उपनगराध्यक्ष मो. जावेद हा. अ. गनी यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अपंग, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटितांकरिताटी योजना आदींसाठीचे अनुदान बँकेमार्फत दिले जाते; मात्र काही वृद्ध लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे अनुदान वाटपाच्या वेळी उमटत नसल्यामुळे त्यांना चार-चार महिने अनुदानच मिळालेले नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचे अनुदान थेट धनादेशाद्वारे देण्यात यावे, अशी मागणी उपनगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search