Next
पंडिता मनीषा साठे यांना ‘सारंग सन्मान’ जाहीर
प्रेस रिलीज
Monday, February 04, 2019 | 03:55 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचा तपपूर्ती महोत्सव सहा ते आठ फेब्रवारी २०१९ या कालावधीत पुण्यात आयोजित केला आहे. या महोत्सवात तीनही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या वर्षीचा सारंग सन्मान पंडिता मनीषा साठे यांना जाहीर करण्यात आला आहे. हा महोत्सव कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दररोज सायंकाळी ६.४५ वाजता होईल, अशी माहिती ‘मधुरिता’च्या संस्थापक-संचालक प्राचार्या अर्चना संजय यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.  

सहा फेब्रुवारीला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मनीषा साठे, अर्चना संजय या नृत्यगुरूंच्या संरचना ‘अभिव्यक्ती’ या नृत्याविष्कारांतर्गत सादर केल्या जाणार आहेत. या वेळी प्रख्यात तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर, तसेच महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे .

सात फेब्रुवारीला ‘अभिजात’ या अविष्कारांतर्गत सारंग सन्मान प्रदान समारंभ आणि पंडित राजेंद्र गंगाणी, पंडित योगेश शमसी यांची विशेष प्रस्तुती आयोजित केली आहे. यंदाच्या तपपूर्ती सारंग सन्मानाच्या मानकरी ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता मनीषा साठे या आहेत. सकाळ माध्यम समूहाचे चेअरमन पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे. तपपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन पुणे लोकसत्ताचे संपादक आणि कलासमीक्षक मुकुंद संगोराम, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहोळ, कायदेतज्ञ, अभ्यासक-वक्त्या आणि तपपूर्ती सोहळ्याच्या स्वागताध्यक्ष ॲड. शीतल चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

आठ फेब्रुवारीला ‘अभिनव’ या अविष्कारांतर्गत एकल नृत्य प्रस्तुती सादर होणार आहे. त्यात वल्लरी आपटे, सुजाता गावडे, दीक्षा त्रिपाठी, राजश्री घोंगडे, सिद्धी पोटे यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. समारोप सोहळ्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विश्व मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड आणि दिग्दर्शक संजय सिंगलवार यांची उपस्थिती असणार आहे.

सहा ते आठ फेब्रुवारी या तीनही दिवशी नृत्यगुरू अर्चना संजय यांच्या शिष्या कथ्थक नृत्य सादर करणार आहेत. त्यांना चारुदत्त फडके (तबला), समी उल्लाह खान (हार्मोनियम आणि गायन), नितीश पुरोहित (सरोद), रश्मी मोघे (गायन), तुषार घरत (पखवाज) संगीत मिश्रा (सारंगी) हे साथसंगत करणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search