Next
काव्यसुगंध संमेलन उत्साहात
भारतीय बौद्ध साहित्य परिषद आणि विकास प्रबोधिनीतर्फे आयोजन
मिलिंद जाधव
Saturday, September 08 | 04:41 PM
15 0 0
Share this storyमुंबई :
बौद्ध संस्कृतीची ओळख प्रत्येकाला व्हावी, तसेच महापुरुषांच्या विचारांचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी, जपण्यासाठी व कवितेच्या माध्यमातून स्वतःचे विचार मांडण्यासाठी भांडुप येथील एम. डी. केणी विद्यालयात काव्यसुगंध संमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. मुंबईतील भारतीय बौद्ध साहित्य परिषद आणि विकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले होते. 

महापुरुषांना केंद्रस्थानी ठेवून मैत्री गीताने कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड होते. विलास बसवंत, साजन शिंदे, किरण सोनावणे, शांतिदूत शिर्के, कांतिलाल भडांगे, राजरत्न राजगुरू, गजानन गावंडे यांच्यासह विविध ठिकाणांहून आलेल्या कवींनी विविध विषयांवर स्वरचित दर्जेदार कविता सादर केल्या. 

‘चळवळीच्या कविता, प्रबोधनात्मक गाणे अशा विविध प्रकारच्या साहित्याच्या माध्यमातून आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवणे आजच्या काळाची गरज आहे. तसेच नवीन कवी तयार झाले पाहिजेत. अशा कवींना विचारपीठ उपलब्ध करून देण्याचे काम भारतीय बौद्ध साहित्य परिषद सातत्याने करीत आहे,’ असे कार्यक्रमाचे अध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड यांनी सांगितले. 

सहभागी कवींना प्रमाणपत्र व शौर्यगाथा बौद्ध साहित्य स्मरणिका भेट म्हणून देण्यात आली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी नवनाथ रणखांबे, साहित्यिक जगदेव भटू यांनी केले होते. कार्यक्रमाचे आयोजक कवी श्रीकृष्ण ठोंबरे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link