Next
मस्कतमध्येही मराठी!!!
BOI
Saturday, March 03 | 02:30 PM
15 0 0
Share this story

‘कितीही गेलो दूर त्या देशी, पण धरणी माझी माय मराठी’ हा परदेशी गेलेल्या मराठी माणसांचा प्रातिनिधिक अनुभव असतो; म्हणूनच यांपैकी अनेक मंडळी आपण ज्या देशात असू तिथे मराठी वातावरण तयार करण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला मातृभाषा म्हणजेच मराठी शिकविण्यासाठी प्रयत्नशील असतात. मूळच्या पंढरपूरच्या आणि सध्या मस्कतमध्ये असलेल्या गार्गी पोळ या त्यापैकीच एक. मस्कतमध्ये मुलांना मराठी भाषा आणि खेळ शिकवण्यासाठी त्या कार्यशाळा घेतात. ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या मराठी राजभाषा दिन उत्सवानिमित्ताने गार्गी  पोळ यांचे अनुभव प्रसिद्ध करत आहोत. 
..............
मस्कतमध्ये राहायला आल्यापासून नेहमीच आपल्या मराठी संस्कृतीचा खूप अभाव जाणवत होता. विशेष करून माझ्या मुलीला, सायुज्यताला वाढवताना कायमच आपल्या मराठी संस्कृतीची उणीव जाणवायची. त्यामुळे मग घरात सण-समारंभ काटेकोरपणे साजरे करण्यास सुरुवात झाली. एक दिवस सायुज्यताने तिच्या School Almacमधलं ‘मदरटंग मराठी’ वाचून प्रश्न विचारला, की आई तुझी toungue कशी मराठी गं?’ त्याच दरम्यान मराठी भाषा दिवस होता आणि त्या संदर्भात खूप मेसेजेस, लेख येत होते. ते वाचून अंतर्मनात कुठे तरी मराठी शिकवायची इच्छा अजूनच पक्की झाली. मराठीचे वर्ग घ्यायचे हा निर्णय मागच्या वर्षीच्या मराठी भाषा दिनीच घेतला. आम्ही तसे भारताच्या फार लांब नसल्याने वर्षातून एकदा तरी भारतात चक्कर होतेच. त्यामुळे मुलांना तोडकी-मोडकी का होईना, पण मराठी बोलता येते. मुलांच्या परीक्षा खूपच जवळ येत होत्या, तरीही  मराठीची कार्यशाळा घेण्याचा मानस जवळच्या मराठी मैत्रिणीकडे बोलून दाखवला. सगळ्याच जणींनी कल्पना उचलून धरली.

परीक्षा झाल्यानंतर केवळ एका मेसेजवर साधारण १८ मुले आली आणि कार्यशाळा सुरू झाली. मराठीची अक्षरओळख, खेळ, गोष्टी अशी रूपरेखा ठरवली. जे मला येत होते, ते पहिल्या कार्यशाळेत मनापासून शिकवले. सांगता कार्यक्रमाला दिंडी करायची ठरवली. मी पंढरपूरची असल्याने लहानपणापासूनच दिंडी पाहिल्याने बारीकसारीक सगळीच माहिती होती. रोज एका संताची गोष्ट सांगितली आणि दिंडी केली. सगळ्या पालकांनी दिंडी, ‘दिंडी’सारखी वाटावी म्हणून सगळे साहित्य मनापासून जमवले. दिंडी खूपच छान झाली आणि जणू पांडुरंगाचा आशीर्वादच मिळाला.


सांगता समारंभाला सगळ्या जणींनी आग्रह धरला, ‘कायमच मुलांसाठी काही तरी चालू कर’ म्हणून! महिन्यातून दोनदा खेळ वर्ग सुरू केला. त्यात प्रामुख्याने मराठी खेळ शिकवले जातात. पहिल्या कार्यशाळेत मला जे येत होते ते शिकवले. त्यांनतरच्या सुट्टीत जेव्हा भारतात गेले, तेव्हा सगळे खेळ-साहित्य भारतातून आणले. सागरगोटे, सारीपाट शोधून आणले. विटी-दांडू तर माझी मैत्रीण प्रियांका पांढरपट्टे हिने बनवून आणले. सगळ्या आप्तांनी मी विसरलेले खेळ मला सांगितले आणि माझा खेळ वर्ग समृद्ध झाला. 

खेळ वर्गात आम्ही पुढील खेळ खेळतो – शिवाजी म्हणतो, कांदे फोड, सरबत लिंबू पैशा-पैशाला, बुररर, सांगा सांगा, आंधळी कोशिंबीर, टिकली मारून जावे, रस्सीखेच, विषामृत, गुलाम-चोर, बदाम सात, सावकार भिकार, भारत भारत, जिबली, उड्यांची दोरी, रुमाल पाणी, चुळचुळ मुंगळा, आईचे पत्र हरवले, विटी दांडू, सारीपाट, लगोर, आपडी थापडी, च्याव म्याव, तळ्यात मळ्यात, समन्वय साखळी, पृथ्वी आकाश पाताळ, कमळ उमलले इत्यादी इत्यादी... 

खेळ वर्गात आम्ही या वर्षी गुढीपाडवा, दसऱ्याचे पाटी पूजन, दिवाळीचा किल्ला बनवणे आदी उपक्रम साजरे केले.  सांघिक भावना आणि खेळण्यासाठी कोणत्याही महागड्या खेळण्याची गरज नसते, तसेच खेळण्यातसुद्धा सर्वांचा समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे खेळ वर्गातून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न असतो. आणि निखळ आनंद तर आहेच. त्यामुळे मुले कुठेही भेटली तरी विचारतात, ‘पुढचा खेळवर्ग कधी आहे मावशी?’

या सुट्टीत (विंटर ब्रेक) मराठीची दुसरी कार्यशाळा घेतली. बाकीची रूपरेखा सारखी असली, तरी या वर्षी सांगता समारंभासाठी पोवाडा करायचा ठरवला. त्यासाठी रोज श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली. मुलांना त्या गोष्टी खूप आवडल्या. बऱ्याच अडचणींवर मात करून आम्ही पोवाडा केला. प्रामुख्याने हवी तशी ड्रेपरी इथे मिळत नाही किंवा खूप महाग मिळते आणि आपले बरेच मराठी साहित्य इंटरनेटवरही उपलब्ध नसल्याने खूप शोधाशोध करावी लागते; पण कर्ता करविता बाप्पा यश देतोच. पोवाडा मस्त झाला. तसेच या कार्यशाळेच्या सांगता-समारंभाला विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही केले.

प्रत्येक कामात एकतर पैसा मिळतो, नाही तर समाधान! दोन्ही एकत्र मिळण्याचे योग फार कमी असतात, असे प्रामुख्याने माझ्या नवऱ्याचे गिरीशचे मत आहे आणि ते मला पटते. म्हणून मराठी खेळवर्ग आणि मराठी कार्यशाळेतून आर्थिक फायदा न घेता फक्त निखळ समाधान घ्यायचे ठरवले. मस्कत कार्यशाळा व खेळवर्ग हे कोणत्याही आर्थिक लाभासाठी चालवत नसल्याने ज्या कुणी मैत्रिणी मदत करण्याच्या इच्छेने येतात त्यांची मदत घेते.

पहिल्या कार्यशाळेत प्रियांका मोरे आणि सुवर्णा भामरेने मदत केली. दुसऱ्या कार्यशाळेत नमिता कलकुटकी, सोनल कोष्टी आणि प्रियांका पांढरपट्टे यांनी मदत केली. या उपक्रमामुळे माझ्या मस्कतच्या वास्तव्याला एक नवी दिशा मिळाली आहे. एक वेगळेच समाधान आणि एक नवीन ओळख मिळाली आहे. आता माझ्या उपक्रमाला पहिले वर्ष पूर्ण होत आहे. 

माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जळते मी, 
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी!

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shalaka Koshti About 287 Days ago
Nice
1
0
Meera Mulay About 287 Days ago
गार्गी तुझे खुप खुप अभिनंदन तुझा उपक्रम स्तुत्य आहे तुला खुप खुप शुभेच्छा
3
0
Roshana Sanjay Pawar About 288 Days ago
Gargi khupch chhan... kharach aapli marathi sanskruti lop pavat chaali aahe.... tila aapan japal pahije...mast gargi keep it up...
1
0
Mrudula kulkarni About 288 Days ago
खुपच छान राजश्री
2
0
प्रभाकर पेठकर. About 288 Days ago
सुंदर उपक्रम. अनेकानेक शुभेच्छा.
1
0
Sanjay kulkarni pandharpur About 289 Days ago
सुंदर उपक्रम आहे मराठी व वारकरी पताका masktयेथे फडकली आपला अभिमान वाटला ताई
1
0
Dr Sangeeta Fulsaunder About 289 Days ago
Proud of you!Keep it up
1
0
Jayshree Jagdale About 289 Days ago
Manapasun abhinandan, tu karate te khup mothe aani dhadsache kaam aahe , English/ vinglish chya jamanyat he khup mahtwache aahe !! Off course Mr Girish cha khup support aasel ! Mhanun tyana pan abhinandan. Saat samudrapalikade he kaam karane , khup ch kautukache aahe . Veer Savarkar pan aasude tuzya schedule madhe . Kay lagale tar saang !!
2
0
मुकुंद गणपत पोळ. About 289 Days ago
मराठी भाषेचा झेंडा महाराष्ट्रा बाहेरच नव्हे तर भारताबाहेर फडकविल्याबद्दल गार्गी तुझा अभिमान आहे. तुझे मन:पुर्वक अभिनंदन.
2
0
Girija About 290 Days ago
मराठी संस्कृती तीथे सुध्दा जपतीयेस , वाढवतीयेस आणि मुलांना शिकवतीयेस . खुप अभिमान वाटतो तुझा राज
2
0
Savita Aher About 290 Days ago
Really Dear Rajshree you r doing a good job for our mother tongue ... we r proud of you ..
2
0
asha paldewar About 290 Days ago
Khup Chan ati sunder rajashree mala khup aavadle
2
0
Pooja Kulkarni About 290 Days ago
Good Job Gargi !!Proud Of You!!👍
2
0
Maheshwari About 290 Days ago
Good job dear proud of you
2
0
क्रांतिसिंह किशोर उत्पात About 290 Days ago
लेखन खूपच सुंदर आहे .
3
0

Select Language
Share Link