Next
शतश्लोकी
BOI
Monday, November 12, 2018 | 10:50 AM
15 0 0
Share this story

आदिशंकराचार्य यांना अवतार पुरुष मानले जाते. अद्वैताचा सिद्धांत त्यांनी मांडला. आठव्या वर्षी चारही वेदांचे ग्रहण त्यांनी केले होते. सोळाव्या वर्षी अलौकिक भाष्यरचना केली. ३२ वर्षांच्या काळात त्यांनी अफाट ग्रंथरचना केली. भाष्यशास्त्र, स्तोत्रग्रंथ, तंत्रग्रंथ व प्रकरण ग्रंथ अशा चतुर्विध स्वरूपात ग्रंथभांडाराचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक विधीचा वेगळा विचार सांगितला आहे.

शंकराचार्य यांनी ४० पेक्षा अधिक ग्रंथरचना केल्या. त्यातील १०० रचनेचे निरुपण ‘शतश्लोकी’तून प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड यांनी केले आहे. गुरुकृपा रहस्यमध्ये गुरूंचा लाभ कसा घडतो हे सांगितले आहे. स्त्री, पुत्र, घोडा, बैल यांनाच जीव सुखाचे आधार कसे मानतो हे स्पष्ट करताना घरासारख्या निर्जीव वस्तूविषयीची आसक्ती, देहवृत्तीचा खरा धर्म, स्वर्ग-स्व त्याग, परिवर्तनशीलता, शांत, विवेकी जीवनशैलीची आवश्यकता, सफल व्यवहाराचे मूळ अशा विविध गोष्टींचा परामर्श यात घेतला आहे. आदिशंकराचार्य यांच्या अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचे रसग्रहण यात केले असून, सामान्यांना ते समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.
      
प्रकाशन : ॠचा प्रकाशन
पृष्ठे : २१६
मूल्य : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link