Next
देसाई आय हॉस्पिटलमध्ये सीबीएम फेको ट्रेनिंग सेंटर
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 01:05 PM
15 0 0
Share this article:पुणे : एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये सीबीएम फेको ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरचे उद्घाटन १३ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी दोन वाजता हॉस्पिटलच्या शंकर साबळे सभागृहामध्ये कार्ल झाइस मेडिटेक एजीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लडविन मॉन्झ व सीबीएम जर्मनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रेनर यांच्या हस्ते होणार आहे.

या वेळी सीबीएम इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सारा वारूघीस, महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील, सीबीएमचे सल्लागार डॉ. हरप्रीत कपूर आणि पीबीएमएच्या देसाई आय हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई, पीबीएमएचे अध्यक्ष राजेश शहा, मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी परवेझ बिलिमोरिया आणि मानद सचिव किशोरभाई व्होरा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जगातील सर्वांत नामवंत कार्यरत मायक्रोस्कोप उत्पादक कंपनी असलेल्या झाईस जर्मनी यांचे या कार्यक्रमाला तांत्रिक सहकार्य लाभले आहे. या फेको ट्रेनिंग सेंटरचे कामकाज जागतिक निकष व मानके यांवर आधारित असेल.

या विषयी माहिती देताना मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे म्हणाले, ‘एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल हे नेत्र चिकित्सेमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यामध्ये व या सोयी सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी निरंतर प्रशिक्षणाची आवश्यकता असते. फेको ट्रेनिंग सेंटरच्या मदतीने मोतीबिंदूच्या रुग्णांवर फेको शस्त्रक्रिया (फेको इमल्सीफिकेशन प्रोसिजर) करण्यासाठी अधिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होतील.’

‘झाइस इंटरनॅशनल आणि सीबीएम या दोन जागतिक पातळीवरच्या आघाडीच्या संस्थांनी देसाई आय हॉस्पिटलची फेको ट्रेनिंगसाठी निवड केली आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. या दोन्ही संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: उद्घाटनाला पुण्यात उपस्थित राहणार असून, यावरून याचे महत्त्व अधोरेखित होते. शल्यविशारदांना दिले जाणारे प्रशिक्षण हे अद्ययावत सुविधांद्वारे आंतरराष्ट्रीय मापदंड व निकषांच्या आधारे दिले जाईल,’ असे डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.

देसाई आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप डोळे म्हणाले, ‘मोतीबिंदू हा जगभरात होणार्‍या अंधत्वाच्या टाळता येणार्‍या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया तंत्रामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. स्मॉल इनसिजन कॅटरॅक्ट सर्जरीच्या (एसआयसीएस) तुलनेत फेको तंत्रज्ञानाद्वारे कमी आकाराचे छेद केल्यामुळे रुग्ण आणखी लवकर बरा होतो. या प्रकारच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी रुग्णांना चष्मा वापरण्याची गरज भासू शकते. फेको शस्त्रक्रियेमुळे मोतीबिंदूच्या सुरुवातीच्या टप्प्यावर चिकित्सकांना शस्त्रक्रिया करण्यास सोपे जाते आणि रुग्णाला लवकरात लवकर उपचार घेणे शक्य होते. प्रत्येक रुग्णासाठी फेको शस्त्रक्रिया ही योग्य नसली, तरी बर्‍याच रुग्णांचे या तंत्राच्या साहाय्याने उपचार केले जाऊ शकतात.’

‘फेको इमल्सीफिकेशन या शस्त्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात सूक्ष्म प्रकारच्या छेदन प्रक्रियेचा समावेश असतो व त्यानंतर अल्ट्रासाउंडच्या मदतीने मोतीबिंदू काढण्यात येतो. ज्यामुळे नेत्रपटलाला कमीत कमी त्रास होतो आणि सूक्ष्म छेदन व कमीत कमी टाक्यांमुळे लवकर बरे होण्यास मदत होते. डोळ्याची तपासणी करून आणि रुग्णांच्या गरजा लक्षात घेता या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात येते,’ अशी माहितीही डॉ. डोळे यांनी दिली.

देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश कापसे म्हणाले, ‘नेत्रतज्ञांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असलेल्या जर्मनीस्थित संस्था क्रिस्तोफेल ब्लाइंडेन मिशन आणि झाइस यांच्या मदतीने हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या ट्रेनिंग सेंटरद्वारे शहरातील नेत्रतज्ञांना फेको ट्रेनिंग कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search