Next
‘मोबाइक’तर्फे ‘डॉकलेस बाइक शेअरिंग’ सेवा
प्रेस रिलीज
Monday, July 30, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this storyपुणे : बाइक शेअरिंगमध्ये अग्रेसर असलेल्या मोबाइकने येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये डॉकलेस बाइक शेअरिंग सेवेची सुरुवात केली आहे. यात नारंगी रंगाच्या १०० पेक्षा अधिक सिग्नेचर मोबाइक बाइक (सायकल) आता तीन हजार विद्यार्थी आणि कॉलेजच्या फॅकल्टी मेंबर्ससाठी मागणीनुसार उपलब्ध असतील.

एमआयटी हे पहिले असे कॅंपस आहे ज्यामध्ये अशाप्रकारची मोबाइक सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा भविष्यात फायदेशीर ठरणारी आहे. मोबाइकचा उद्देश पुण्यात कमीत-कमी कालावधीत आपल्या सेवेचा विस्तार करणे आणि पर्यायाने प्रदूषण कमी करण्यास मदत करणे हा आहे. अशाप्रकारची सेवा पर्यावरण, प्रदूषण या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यास उपयोगी ठरेल.

मोबाइकचे हे अॅप्लिकेशन वारण्यात अतिशय सोपे असून, यातील सेवेचा लाभ घेण्याचे विकल्प ही समजण्याजोगे आहेत. वॉलेट, नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड आणि यूपीआई यांद्वारे मोबाइक अॅप डिजिटल बनले आहे. याचबरोबर अतिशय वाजवी दरात ९९ रुपयांच्या मासिक पासाची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.

मोबाइक इंडियाचे सीईओ विभोर जैन म्हणाले, ‘एमआयटी परिसरात मोबाइक उपलब्ध करून देण्यामागील आमचा उद्देश विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांस सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. याचबरोबर पुण्यास एक आदर्श शहर बनविणे, सुलभ आणि किफायती विकल्प प्रदान करणे हा मानस आहे.’

एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड म्हणाले, ‘आम्ही मोठ्या आनंदाने मोबाइकचे स्वागत करत आहोत. आमच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी ही सेवा खूपच सुलभ ठरेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link