Next
‘ओरिएंट’तर्फे ‘पोर्टेबल फॅन्स’ची नवी श्रेणी सादर
प्रेस रिलीज
Friday, December 28, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : सीके बिर्ला ग्रुपचा भाग असलेल्या ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने अनोख्या डिझाइन्स असलेल्या लाइफस्टाइल पोर्टेबल फॅन्सची नवी रेंज सादर केली.

या प्रसंगी ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेडच्या फॅन्स विभागाचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल जैन म्हणाले, ‘मुलांसाठी अधिक सुरक्षित पोर्टेबल पंखे, एसी असलेल्या रुममध्ये हवा अधिक चांगल्या पद्धतीने खेळती राहाण्याची गरज, देवघरासारख्या छोट्या खोल्यांमध्ये हवेची अधिक वैयक्तिक गरज अशा काही मुद्दयांमुळे ग्राहकांना पारंपरिक पद्धतीच्या पंख्यापेक्षा अधिक काहीतरी देण्याचा विचार करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आमच्या सर्व लाइफस्टाइल रेंजमध्ये ग्राहकांची मते आणि त्यांच्या महत्त्वाच्या गरजांवर भर देण्यात आला आहे. इतरांपेक्षा वेगळे असणे किंवा एक्स्लुझिव्हिटीला मूर्त रूप देणारे हे पंखे एलिगन्सचे उत्तम उदाहरण आहेत.’

‘वाढते उत्पन्न आणि महत्त्वाकांक्षा त्याचप्रमाणे डिजिटल व ग्लोबल लाइफस्टाइल आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विभागात वैयक्तिक आवड म्हणजेच इंडिव्हिज्युअलायझेशनचा ट्रेंड वाढत आहे. ग्राहकांना आयुष्य अधिक सोपे आणि अनुभव अधिक चांगला बनवणारी इंडिव्हिज्युअलाज्ड उत्पादने हवी असतात. मोबाइल लाइफस्टाइल पंख्यांची आमची ही लक्झुरिअस रेंज आधुनिक महत्त्वाकांक्षी ग्राहकांना नक्की रुचेल आणि त्यांच्या घर व ऑफिसच्या सजावटीत ग्लॅमरस भर घालेल,’ असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला.

ओरिएंट इलेक्ट्रिकने लाइफस्टाइल सीरिजमध्ये चार पंखे सादर केले आहेत. ओरिएंट ब्लेडलेस पंख्यांमध्ये फिजिक्स आणि एअरोडायनॅमिक्सचा मेळ साधत अनोखी डिझाइन देण्यात आली आहे. या सुबक पंख्यासोबत रिमोल कंट्रोलही आहे. शिवाय या पंख्यामध्ये इन-बिल्ट मूड लायटिंग आहे. यात चार रंगांचे पर्याय आहेत आणि या पंख्यांचा स्टँडबाय टाइम पंखा ७.५ तास आहे. ओरिएंट मोनरो टॉवर फॅन इतक्या सहजसोप्या आणि कॉम्पॅक्ट आकारात येतो की तो अगदी स्वयंपाकघराचा ओटा, दुकान किंवा वर्कस्टेशन अशा कोणत्याही छोट्या-मोठ्या जागी सहज वापरता येतो.

या पंख्यामध्ये तीन स्पीड सेटिंग, इन-बिल्ट टायमर आणि रिमोट कंट्रोल असल्याने याचा वापर अगदी सहज करता येतो. ओरीएंट ऑक्टरमध्ये थ्री-डी ऑटो-ऑसिलेशन सुविधा आहे. त्यामुळे खोलीच्या कानाकोपऱ्यात हवा पोहोचते. स्टायलिश आणि कॉम्पॅक्ट आकारातील ओरिएंट ऑक्टरला टच स्क्रीन कंट्रोल, इन-बिल्ट टायमर सुविधा आणि रिमोट कंट्रोल असल्याने याचा वापर सहज होतो. ओरिएंट प्रोटेस हा लक्झरी बॉक्स फॅन आहे. कॉम्पॅक्ट डिझाइन, सुपर सायलंट मोटर, लांबी कमी-जास्त करण्याची सुविधा आणि थ्री स्पीड सेटिंगसोबतच यात टायमर कंट्रोलही आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search