Next
‘सॅमसंग’तर्फे ‘एलईडी फॉर होम’ भारतात दाखल
प्रेस रिलीज
Wednesday, September 19, 2018 | 03:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने भारतात जगातील पहिला ‘एलईडी फॉर होम’ दाखल केला आहे. अॅक्टिव्ह एलईडी असेही म्हटला जाणारा हा एलईडी घरासाठी तयार केलेला असा पहिलावहिला असून, त्यामुळे ग्राहकांना टीव्ही पाहण्याचा नवा, समृद्ध व उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे.

एचएनआय, काम करणारे प्रोफेशनल आणि घरी बसून, सिनेमा पाहण्याचा उत्कृष्ट अनुभव अपेक्षित असलेले व उत्तमोत्तम ऑडिओ-व्हिज्युअल कार्यक्रम सुपर-प्रीमिअम स्क्रीनवर पाहणारे उच्चभ्रू व आकांक्षी तरुण यांच्यासाठी प्रामुख्याने ही अत्याधुनिक होम डिस्प्ले टेक्नालॉजी सादर करण्यात आली आहे.

सॅमसंगच्या ‘एलईडी फॉर होम’मध्ये उत्कृष्ट व्हिज्युअल डेफिनिशन आहे, तसेच विशेषतः सिनेमा पाहण्याचा अपूर्व अनुभव देण्याची क्षमता आहे. डिस्प्लेच्या मोड्युलर कॉन्फिगरेशनमुळे व विविध वैशिष्ट्यांमुळे हा एलईडी कोणत्याही स्वरूपाच्या घरामध्ये साजेसा असा बनवण्यात आला आहे.

या अॅक्टिव्ह एलईडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश केला आहे व त्यामुळे टीव्ही पाहण्याचा अभूतपूर्व आनंद ग्राहकांना मिळणार आहे. स्लिम, स्लीक डिझाइन हे या एलईडीच्या अतिशय प्रगत स्क्रीनचे वैशिष्ट्य आहे; तसेच त्यामध्ये मोड्युलर फॉर्मेशन टेक्नालॉजी वापरली असल्याने युजरना कोणत्याही ठिकाणी एलईडी मावण्याच्या दृष्टीने स्क्रीनचा आकार व प्रमाण कमी-अधिक करता येऊ शकते.  

सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स एन्टरप्राइज बिझनेसचे उपाध्यक्ष पुनीत सेठी म्हणाले, ‘सॅमसंगमध्ये आम्ही नेहमी ग्राहकांना जास्तीत जास्त आनंद मिळावा, यासाठी प्रयत्न करतो. ग्राहकांचे म्हणणे आणि त्यांच्या अपेक्षा व गरजा समजून घेतल्याने आम्ही हे नवे उत्पादन तयार करू शकलो. आम्ही ग्राहकांना विविध प्रकारचा अत्याधुनिक डिस्प्ले उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’ यांनी सांगितले.

‘एलईडी फॉर होम खोलीतील सर्व घटकांशी योग्य प्रकारे जुळवून घेतो व त्यामुळे ग्राहकांना टीव्ही पाहण्याचा अपूर्व आनंद मिळतो. या एलईडीमुळे ग्राहकांच्या लिव्हिंग रूमचे रूपांतर होम सिनेमामध्ये होईल आणि ग्राहकांना प्युअर ब्लॅक, उत्कृष्ट रंग व अत्यंत दर्जेदार कार्यक्रम दिसतील, अशा प्रकारे त्याची निर्मिती केली आहे. सॅमसंग सातत्याने नाविन्य आणण्याच्या प्रयत्नात असते आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे दर्शन घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे,’ असे सेठी यांनी सांगितले.

सॅमसंगच्या ‘एलईडी फॉर होम’मध्ये एचडीआर पिक्चर रिफाइन्मेंट टेक्नालॉजीचा समावेश असून, त्यामुळे अप्रतिम, वास्तव वाटावी अशी इमेजरी व सुस्पष्ट दृष्यमानता यांची सांगड घातली जाते. तसेच, आजूबाजूच्या प्रकाशाचा परिणाम न होता ती तशीची कायम व सातत्यपूर्ण राहते. मालिकेमध्ये ११०-इंच एफएचडी, १३०-इंच एफएचडी, २२०-इंच युएचडी व २६०-इंच युएचडी यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रो-डिस्चार्ज (ईएसडी) प्रमाणित अॅक्टिव्ह एलईडीसाठी मेंटेनन्स अतिशय कमी करावा लागतो व तो दीर्घ काळ उत्तम चालत असून, त्याचे आयुष्य १००,०००+ तास आहे. एलईडीची मेंटेनन्स झटपट व सोयीस्करपणे व्हावा म्हणून त्याच्या महत्त्वाच्या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील व मागील बाजूने लवचिक स्वरूपाची सुविधा केलेली आहे. हे उत्पादन मुंबईमध्ये ‘इन्फोकॉम २०१८’ या प्रो-ऑडिओ व्हिज्युअल व इंटिग्रेटेड एक्स्पिरिअन्स टेक्नालॉजिज यासाठी भारतातील विशेष ट्रेड फेअरमध्ये दाखल करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search