Next
‘शाओमी’च्या तीन नवीन स्मार्टफोन उत्पादक कंपन्या
प्रेस रिलीज
Friday, April 13 | 04:30 PM
15 0 0
Share this story

शाओमीतर्फे आयोजित सप्लायर इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये नवीन कंपन्यांची घोषणा करताना (डावीकडून) शाओमी ग्लोबलचे उपाध्यक्ष झांग फेंग, चायनीज दूतावासाचे मिनिस्टर काऊन्सेलर ली बिजीयेन,नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व शाओमी इंडियाचे एमडी मनु जैन

नवी दिल्ली  :  ‘शाओमी’ या स्मार्टफोन ब्रँडने भारतात तीन नवीन स्मार्टफोन उत्पादक कंपन्या सुरू केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या भारतातील त्यांच्या पहिल्याच सप्लायर इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये या घोषणा करण्यात आल्या.

शाओमीने फॉक्सकॉनच्या सहयोगाने तीन नवीन स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आणि पीसीबीए (प्रिन्टेड सर्किट बोर्ड असेम्ब्ली) युनिट्सचे उत्पादन करणाऱ्या एसएमटी (सरफेस माऊंट टेक्नोलॉजी) कंपनी स्थापन केल्या असून, या तीन स्मार्टफोन उत्पादक कंपन्या श्री सिटी, आंध्रप्रदेशमधील कॅम्पसेस व तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदुर येथे आहेत. 

शाओमीने ‘हायपॅड टेक्नोलॉजी’च्या सहयोगाने नोएडा येथील त्यांच्या पॉवर बँक उत्पादक कंपनीमध्ये स्मार्टफोन निर्मितीस सुरूवात केली आहे. शाओमीच्या भारतात एकूण सहा स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आहेत.  

शाओमी ग्लोबलचे उपाध्यक्ष व शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले, ‘शाओमीची वाजवी दरातील उच्च दर्जाची, उत्तमरित्या डिझाइन करण्यात आलेली उत्पादने वैविध्यपूर्ण भारतीय स्मार्टफोन उद्योगामध्ये उपयुक्त ठरत आहेत. २०१५  मध्ये आम्ही ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सहयोग जोडत भारतीय बाजारपेठेसाठी असलेली आमची दीर्घकालीन कटिबद्धता वाढवली.  आम्ही नवीन स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आणि पीसीबीए उत्पादन करणाऱ्या कंपनीसह आमची कटिबद्धता अधिक प्रबळ करत आहोत. शाओमी ही पीसीबीएचे स्थानिक उत्पादन  सुरू करणारी देशातील अग्रणी कंपनी आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे कार्य आम्ही सुरूच ठेवू.’

 ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला भारतात पहिली सप्लायर इन्वेस्टमेंट समिट आयोजित करताना खूप आनंद होत आहे.आम्हाला विश्वास आहे की, यामुळे आमच्या पुरवठादारांना देशात उत्पादन पाया निर्माण करण्यामध्ये मदत होईल.  यामुळे रोजगार संधी व गुंतवणुकीला चालना मिळेल आणि देशाची एकूण अर्थव्यवस्था वाढवण्यामध्ये मदत होईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link