Next
‘पुणे शहर राष्ट्रवादी’तर्फे कर्तृत्ववान तरुणाईचा सन्मान
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, January 12, 2019 | 04:58 PM
15 0 0
Share this storyपुणे : स्वामी विवेकानंदाच्या जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान सात युवक आणि युवतींना गौरविण्यात आले. कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे पश्चिम विभाग अध्यक्ष सनी मानकर यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाचे हे प्रथम वर्ष होते. हा उपक्रम १२ जानेवारी २०१९ रोजी सकाळी पुणे फिल्म कास्टिंग कार्यालय, सातारा रोड येथे झाला. या उपक्रमांतर्गत रफिक जमादार, किरणकुमार कोरे, विपुल साळुंखे, अमोल कांगणे, प्रेरणा चव्हाण, कोमल बन्सल आणि आसमी जैन या सात जणांना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

रफिक जमादार हे ‘एडीजीपीआय इंडियन आर्मी अँड नॅशनल डिफेन्स’मध्ये कार्यरत असून, राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील तरुण प्रशिक्षणार्थी आहेत. किरणकुमार कोरे याने श्रीलंकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून लावणीसाठी सुवर्णपदक मिळवले आहे; तसेच ‘छत्रपती शासन’ या चित्रपटात लावणी सादर करून किरण कोरे हा चित्रपटात लावणी करणारा पहिला मुलगा ठरला. विपुल साळुंखे कलाकार, मॉडेल आणि चित्रपट निर्माता आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेद्वारे ते प्रसिद्ध आहेत. अमोल कागणे यांना  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले असून, येत्या वर्षात ‘अमोल कागणे फिल्म्स’ या एकाच प्रोडक्शन हाउसचे तब्बल सहा मराठी चित्रपट घेऊन ते येणार आहेत, ही मराठीतील पहिलीच घटना आहे. प्रेरणा चव्हाण या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असून, अत्यंत कमी वयात त्यांनी अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. डॉ. कोमल बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष काम केले आहे. प्राणीमित्र आसमी जैन यांनी एका वर्षात तब्बल शंभर भटक्या वन्यजीवांना जीवनदान दिले आहे.

या सर्वांनीया अत्यंत कमी कालावधीत आदर्श कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. या वर्षीपासून दरवर्षी युवादिनी हा सन्मान उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सनी मानकर यांनी या प्रसंगी दिली.  

कार्यक्रमाचे आयोजन सनी मानकर यांनी, तर नियोजन महेश शिर्के यांनी केले. या प्रसंगी मिलिंद वालवडकर, प्रमोद शिंदे, स्वप्नील खवले, शुभम माताळे, आकाश मोहकर, सौरभ दसपुते, ऋषिकेश कडू, अमर सहाने, श्रीकांत बालघारे, शुभम झेंडे, व्यंकटेश भोंडवे, प्रणव बहिरट, रोहित पळसकर, शुभम मारणे हे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link