Next
स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना देणारी दिनदर्शिका
मराठीतील २६ कलाकारांची वीरांच्या वेशभूषेतील छायाचित्रे समाविष्ट
BOI
Friday, January 18, 2019 | 06:31 PM
15 0 0
Share this story

अभिनेत्री सई ताम्हणकर सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत

मुंबई : छायाचित्रकार तेजस नेरूरकर यांनी स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्यासाठी एका अनोख्या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. ‘वंदे मातरम् २०१९’ या दिनदर्शिकेसाठी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील २६ कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेतील त्यांची छायाचित्रे काढली आहेत. ही छायाचित्रे या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. 

सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते नुकतेच या दिनदर्शिकेचे उद्घाटन करण्यात आले आहे. या दिनदर्शिकेत छायाचित्रे असलेल्या २६ कलाकारांध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर, नेहा महाजन, डॉ. अमोल कोल्हे, प्रियदर्शन जाधव, पूजा सावंत, सुनील बर्वे, सोनाली कुलकर्णी, उमेश कामत, सागर देशमुख, श्रेया बुगडे यांच्यासह अन्य कलाकारांचा समावेश आहे. 

अभिनेता अमोल कोल्हेझाशीची राणी, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस या आणि अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा कलाकारांनी साकारली आहे. अगदी हुबेहुब झालेल्या या वेशभूषा खरोखर स्वातंत्र्यवीरांची आठवण जागृत करत आहेत. तेजस नेरूरकर यांनी टिपलेल्या या छायाचित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.   
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link