Next
कोलते-पाटील डेव्हलपर्सचा परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीवर भर
प्रेस रिलीज
Friday, February 23, 2018 | 06:11 PM
15 0 0
Share this article:

कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ सारडा
पुणे : ‘रेरा आणि जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर गृहनिर्माण क्षेत्रात व्यापारी वातावरणात काही बदल झाले असले तरी ग्राहकांमध्ये आत्मविश्वास दिसून येत असून पध्दतशीर, अंमलबजावणीवर विश्वास ठेवणाऱ्या विकसकांसाठी मागणी कायम राहिली आहे’, असे मत कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ सारडा यांनी व्यक्त केले. कंपनीच्या आगामी योजना, धोरणे याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘गृहनिर्माण क्षेत्रात सध्या खेळत्या भांडवलाची टंचाई आहे. मात्र, आर्थिक वातावरण तंग असताना देखील आम्हाला मागणीत कमतरता जाणवली नाही. वित्तीय वर्ष २०१८ च्या सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला ग्राहकांकडून ७३२ कोटींचे ठोस उत्पन्न मिळाले, तर आर्थिक वर्ष १८ च्या  तिसऱ्या तिमाहीत २८० कोटी रुपये जमा झाले. मागील १८ तिमाहीतील हा सर्वाधिक मोठा आकडा मानला जातो. पुढच्या आर्थिक वर्षात हा ट्रेंड आणखी उंचावलेला दिसेल ही अपेक्षा आहे. ग्राहकांची बदलती भूमिका, सतर्कता यामुळे आम्ही सातत्याने उत्तम कामगिरीवर भर दिला आहे. आर्थिक वर्ष १७-१८च्या सप्टेंबर महिन्यांत आम्ही  एक हजार ७९१ घरांचा ताबा दिला असून पूर्ण २०१८  वित्तीय वर्षात दोन हजार घरांचा ताबा देण्याकरिता सज्ज आहोत’.
 
 ‘सध्या या बाजारपेठेत परवडणाऱ्या घरांना मागणी आहे. आमच्यादृष्टीने ४०लाख रुपये किंमतीची घरे ही परवडणाऱ्या घरांच्या गटात येतात. ग्राहक आता अधिक सजग झाल्याने ते थोडे पैसे अधिक मोजायला लागले तरी चालतील पण दर्जेदार उत्पादन, वेळेत ताबा देणाऱ्या विकासकांना प्राधान्य देत आहेत. आता थोड्या कमी दराने मिळतेय म्हणून पाच सहा वर्षे ताबा मिळण्यास कालावधी असलेल्या प्रकल्पापेक्षा थोडी किंमत अधिक असली तरी लवकर ताबा मिळणाऱ्या किंवा तयार घरे घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आता या बाजारपेठेत उत्तम विकसकच राहतील. ज्यांच्या प्रकल्पाचे काम थांबलेले नाही,नियमितपणे सुरू आहे, वेळेत ताबा देण्यावर भर आहे. अशा विकासकांना ग्राहक प्राधान्य देत असल्याने आमच्या गृह विक्रीवर परिणाम झालेला नाही. त्यामुळे आर्थिकस्थितीही भक्कम आहे’, असे सारडा यांनी स्पष्ट केले. 

‘एमआयजी, परवडणारी घरे आणि लग्झरी प्रकल्प यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने नवीन अधिग्रहण आणि भागीदारीसाठी प्रयत्न  करत आहोत. आम्ही आता किफायतशीर गृहनिर्माण ठसा उमटविण्यावर भर दिला आहे. पुण्यातील लाईफ रिपब्लिक आणि आयव्ही इस्टेटसारख्या सध्याच्या प्रकल्पांमध्ये तीन एमएसएफ कलम ८० आयबी यांचा समावेश आहे.  विकासक म्हणून आम्हाला शून्य कर लाभ मिळणार आहे मात्र, आमच्या खरेदीदारांना त्याचा फायदा नक्की होईल.ग्राहकांना दिलेला शब्द वेळेवर पाळण्याकडे आमचा भर असतो. ग्राहकांच्या गरजेनुरूप उत्पादन आणि  विक्री केल्याने आमचे विक्री आणि विपणन क्षेत्र विस्तारले असून ब्रँड आणखी बळकट झाला आहे,’ असे ही त्यांनी सांगितले. 

‘कंपनीला आयसीआयसीआय व्हेंचर्स, जेपी मॉर्गन, आयएल अँड एफएस, आस्क इन्वेस्टमेंट मॅनेजर्स आणि पोर्टमन होल्डिंग्ज, युएसए यांनी पाठबळ दिले असून अलीकडेच ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म केकेआरने लाईफ रिपब्लिक टाऊनशीपमध्ये १९३ कोटी देण्याचे वचन दिले आहे. या निधीचा उपयोग ‘लाईफ रिपब्लिक’चे आर एक सेक्टर’चे आर्थिक ताळेबंद, खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि कर्जफेड करण्यासाठी होईल. कंपनीच्या कर्जाचा बोजाही ५०० कोटींवरून ४०० कोटींवर आणण्यात आला आहे’, असेही त्यांनी सांगितले.

‘कंपनीने वेगवान विक्री आणि विपणन आराखडा विकसित केला असून प्रदेश-आधारित विक्री टीम समवेत पुणे, महाराष्ट्र आणि भारतात आंतरराष्ट्रीय विक्री चॅनल तयार केले आहे. एनआरआय  खरेदीदारांमध्ये भक्कम पाया रोवला असून वर्षात शंभर कोटींची  विक्री केली आहे. पुण्यातील प्रकल्पात जीसीसी, सिंगापूर आणि युएसएमधील गुंतवणुकदारांची मागणी मोठी होती.   मुंबई तसेच बंगळूरूमध्येदेखील आम्ही विस्तार करत असून  ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, इंडोनेशिया आणि कॅनडा येथील नवीन बाजारपेठांमधील मागणी हेरण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. जागतिक ग्राहकांच्या अपेक्षेनुसार किफायतशीर दरात दर्जेदार प्रकल्प तयार करण्यावर कंपनीने  लक्ष  केंद्रित केले आहे’, असे सारडा यांनी सांगितले.  
 
 ‘कोलते-पाटीलने निवासी गृहसंकुल, व्यापारी संकुले आणि आयटी पार्क्ससह कंपनीने पन्नासहून अधिक प्रकल्प विकसित केले आहेत,  पंधरा दशलक्ष चौरस फूट विक्री करण्याजोगी जागा कंपनीच्या मालकीची आहे.  ‘प्रधान मंत्री आवास योजने (पीएमएके) अंतर्गत क्रेडीट लिंक्ड सबसिडी स्कीम (सीएलएसएस) च्या अंमलबजावणीमुळे गृह कर्ज ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये सहज उपलब्ध झाली आहेत. या क्षेत्रामध्ये बदल घडत असून ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देण्याची हीच वेळ आहे. लाईफ रिपब्लिक प्रकल्पमध्ये ‘द ग्रेट इयर एंड सेल’ चे आयोजन केले. निव्वळ तीन महिन्यांमध्ये दोनशे युनिट्सची विक्रमी विक्री झाली’, अशी ही माहिती त्यांनी दिली.

‘ मुंबईत १४ पुनर्विकास प्रकल्प तयार असून या व्यापार मॉडेलसाठी कमी भांडवलाची गरज आहे.  बंगळूरू येथे  होसूर रस्त्यावर आम्ही आधीच एक प्रकल्प सुरू केला आहे आणि कोरमंगला येथे लवकरच दुसरा प्रकल्प सुरु होईल.  ग्राहक अॅप आणि पोर्टलची निर्मिती करत आहोत. पुणे, बंगळूरू आणि मुंबई येथील बाजारांवर आम्ही जास्त लक्ष केंद्रित केले असून येणा-या काही तिमाहींमध्ये आम्ही या ठिकाणी चार नवीन प्रकल्प  सुरु  करणार असून त्यामुळे विक्रीचा जोर अधिक प्रमाणात वाढेल’, असे ही सारडा यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search