Next
नवीन बीएमडब्ल्यू ‘मिनी’चे भारतात आगमन
प्रेस रिलीज
Tuesday, May 29, 2018 | 04:10 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवीन ‘मिनी३-डोअर कूपर एस’, ‘मिनी३-डोअर कूपर डी’, ‘मिनी५-डोअर कूपर’ आणि ‘मिनी कन्व्हर्टीबल कूपर एस’ जून २०१८ पासून ‘सीबीयू’ (कम्प्लिटली बिल्ट-अप) युनिटस्च्या रूपात सर्व ‘मिनी’ डीलरशीप्समध्ये उपलब्ध होणार आहेत.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पावाह म्हणाले, ‘विश्‍वसनीय डिझाइन, अनोखी स्टाइल आणि ड्रायव्हिंग फन अशी कालातीत वैशिष्ट्ये आहेत, जी आयकॉनिक ‘मिनी’ला सर्वात वेगळे बनवते. नवीन ‘मिनी’ हॅच आणि नवीन ‘कन्व्हर्टीबल मिनी’चे भावनिक डिझाइन, गो-कार्टसारखा ड्रायव्हिंग उत्साह आणि उत्कृष्ट फंक्शनॅलिटी सादर करतात. नवीन ‘मिनी हॅच’ आणि नवीन ‘मिनी कन्व्हर्टीबल’चे सादरीकरण भारतात प्रिमियम स्मॉल कार सेगमेंटमध्ये ‘मिनी’च्या असाधारण स्थितीला आणखी मजबूत करेल.’

नवीन ‘मिनी ३-डोअर’ आणि ‘५-डोअर हॅच’ आणि नवीन ‘कन्व्हर्टीबल’ प्रगतीशील कॅरॅक्टरला परिवर्तीत करतात आणि अधिक स्टायलिश व अधिक चांगले दर्शनीय अॅपिअरन्स, स्टँडर्ड इक्विपमेंटमध्ये एन्हान्समेंट आणि इंजिन्स व ट्रान्समिशनच्या तंत्रज्ञान सुधारणेसह ‘मिनी’च्या आकर्षणाला वाढवतात. अशाप्रकारे, मूळ उत्पादनाच्या सब्सटान्सला प्रगत बनवण्यात आले आहे आणि ‘मिनी’च्या विकसति आणि विशिष्ट व्यक्तिमत्त्वावर भर देण्यात आला आहे, जो शहरी वातावरणामध्ये ड्रायव्हिंगच्या उत्साहाचा सर्वोच्च बिंदू असेल.

नवीन ‘मिनी’च्या एक्स-शोरुम किंमती जून २०१८पासून अशा असतील : मिनी३-डोअर कूपर (डिझेल)- २९ लाख, ७० हजार, मिनी ३-डोअर कूपर ए (पेट्रोल)- ३३ लाख २० हजार, मिनी ५-डोअर कूपर (डिझेल)- ३५ लाख, मिनी कन्व्हर्टीबल कूपर ए (पेट्रोल)- ३७ लाख, १० हजार. इनवॉइसिंगच्या वेळी प्रचलित किंमत लागू असेल.

मिनी३-डोअर, मिनी ५-डोअर हॅच आणि नवीन कन्व्हर्टीबल सोलारिस ऑरेंज्ड, एमराल्ड ग्रेड, स्टारलाइट ब्लू, व्हाइट सिल्व्हर, इलेक्ट्रीक ब्लू, मेल्टिंग सिल्व्हर, मिडनाइट ब्लॅक, पेपर व्हाईट, चिली रेड, ब्रिटिश रेसिंग ग्रीन, मूनवॉक ग्रे, कॅरिबियन अ‍ॅक्वा, थंडर ग्रेड आणि मिनी यूअर्स लॅपिसलक्झरी ब्लू या १४ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link