Next
एस. एम. जोशी महाविद्यालयात आयडिया लॅबचे उद्घाटन
BOI
Saturday, July 13, 2019 | 12:12 PM
15 0 0
Share this article:

हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील आयडिया लॅबच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना वैज्ञानिक डॉ. भारत काळे

पुणे : ‘आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे व नाविन्यपूर्ण संशोधनाचे युग आहे. आयडिया लॅबसारख्या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांना वास्तव रूप मिळण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे विविध क्षेत्रातील कल्पनांना मूर्त रूप प्राप्त होऊ शकते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन वैज्ञानिक डॉ. भारत काळे यांनी केले. हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात नुकतेच आयडिया लॅबचे उद्घाटन वैज्ञानिक डॉ. भारत काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद कुलकर्णी होते. ट्रान्सफिनाईट इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रा. लि.चे सतीश जावळे,  आशुतोष कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. बी. आडे  या वेळी उपस्थित होते.

‘संशोधनाची विविध क्षितिजे आजच्या तरुणाईला खुणावत आहेत, अशा वेळी राष्ट्रीय पातळीवर आपल्या विचारांचा ठसा उमटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यात त्यांनी स्वतःला झोकून देऊन कार्यक्षमता सिद्ध करावी,’ असे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी आनंद सुतार या विद्यार्थ्याने कॅन्सरवरील उपचाराबाबत आपली संकल्पना मांडली. 

उपप्राचार्य डॉ. महादेव जर, डॉ. मनीषा सांगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. शकुंतला सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. आनंद हिप्परकर यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search