Next
‘सिंहगड करंडक’अंतर्गत ‘टेकटॉनिक २०१९’ उत्साहात
प्रेस रिलीज
Thursday, February 21, 2019 | 03:18 PM
15 0 0
Share this storyपुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस कुसगाव, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी यांमधील विद्यार्थ्यांनी ‘सिंहगड करंडक २०१९’च्या अंतर्गत ‘टेकटॉनिक २०१९’ या राज्यस्तरीय तंत्रज्ञानविषयक स्पर्धेचे आयोजन सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे केले होते.  

या कार्यक्रमाचे उद्घाटन ल्युपिन रिसर्च पार्कचे डॉ. सजीव चंदरन यांच्या हस्ते झाले. सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. के. एन. गुजर यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसचे प्राचार्य व ‘टेकटॉनिक २०१९’चे समन्वयक डॉ. राजेश ओसवाल यांनी प्रस्ताविक केले. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. के. जे. बोथरा, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. डी. सावंत यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमांतर्गत सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘सिम्युलेशन’मध्ये राज्यातील विविध महाविद्यालयांतील २६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांचे मूल्यमापन डॉ. वैशाली ऊंडाले व डॉ. सतीश पोलशटीवार यांनी केले. ‘आउट ऑफ बॉक्स’मध्ये नवनवीन जाहिरातींची स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रा. अनुराग शिंदे यांनी केले.‘लॉजिक टू मॅजिक’मध्ये औषध शाखेतील विविध अडचणींचे योग्य समाधान व त्यांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसीने केले होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. जयंत खडाळे यांनी केले. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसने ‘युरेका’ या स्पर्धेचे आयोजन केले. यात ई-पेपरद्वारे विविध संशोधनपर विषय सादर करण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ. प्रसाद कदम यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
 


‘सिंहगड करंडक २०१९’अंतर्गत ‘टेकटॉनिक २०१९’ यशस्वी होण्यासाठी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मारुती नवले व संचालकांचे मार्गदर्शन, तसेच संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. डी. सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link