Next
सागर कदम यांच्यातर्फे संस्कार वह्या आणि धान्य वाटप
BOI
Friday, July 26, 2019 | 11:59 AM
15 0 0
Share this article:

हातखंबा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा एक येथे विद्यार्थ्यांना संस्कार वह्यांचे वाटप करताना हिंदूराष्ट्र सेनेचे रत्नागिरी अध्यक्ष सागर कदम. सोबत कार्यकर्ते आणि शिक्षक.

रत्नागिरी : हिंदूराष्ट्र सेनेचे रत्नागिरी अध्यक्ष सागर कदम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील हातखंबा येथील पूर्ण प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सनातननिर्मित ‘संस्कार वह्यां’चे; तर रत्नागिरी येथील विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आशादीप या सेवाभावी संस्थेत धान्य वाटप केले.

हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या प्रेरणेने रत्नागिरी अध्यक्ष कदम यांनी या वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आणि विधायक कार्यासाठी धनाचा विनियोग करून वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी हातखंबा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक हातखंबा शाळा क्रमांक एकमधील विद्यार्थ्यांना सनातननिर्मित संस्कार वह्यांचे वाटप केले. ९६ जणांनी याचा लाभ घेतला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र जाधव यांच्यासह अन्य शिक्षकांसह हिमांशु देसाई, अमोल देसाई, मंदार देसाई, श्रीनाथ सावंत, तेजस साळवी, स्वप्नील सावंत, सिद्धेश देसाई, सुमित सावंतदेसाई, अभी देसाई, अभिषेक खरात, अतुल कुळ्ये, रुद्र माने आदी उपस्थित होते.


या वेळी बोलताना कदम म्हणाले, ‘लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, राष्ट्राची भावी पिढी संस्कारक्षम व्हावी, यासाठी सनातननिर्मित ‘संस्कार वह्या’ खूपच उपयुक्त आहेत. मुलांसमोर राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा आदर्श निर्माण करण्यासह दैनंदिन जीवन आदर्शवत जगण्याच्या दृष्टीने या वह्यांमध्ये मोलाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या वह्या पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना माझ्या वाढदिवशी त्या वितरीत करण्याचे मी ठरवले. हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या प्रेरणेमुळेच अशी कृती करता आली.’

त्यानंतर कदम यांनी आशादीप या विशेष मुलांच्या स्वयंरोजगार व निवासी सेवाभावी संस्थेत १०० किलो तांदूळ आणि तेलाचा डबा यांचे वितरण केले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आणि निवासी यांच्यासह हिंदुराष्ट्र सेनेचे बहुसंख्य कायकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search