Next
‘बोलेरो’च्या विक्रीतून ‘महिंद्रा’चा नवा मैलाचा टप्पा
प्रेस रिलीज
Saturday, April 14, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एमअँडएम लि.) या १९ अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने बोलेरो दाखल केल्यापासून १० लाख युनिटची विक्री करून नवा मैलाचा टप्पा निर्माण केला असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.

बोलेरोने भारतातील आघाडीच्या १० प्रवासी वाहनांमधील स्थानही पुन्हा मिळवले असून, या यादीत बोलेरोला देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही म्हणून तिसरा क्रमांक मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, १७ टक्के वाढ नोंदवणाऱ्या या उद्योगाला मागे टाकत बोलेरोने वार्षिक २३ टक्के साध्य केली आहे.

या यशाविषयी बोलताना ‘महिंद्रा’च्या सेल्स व मार्केटिंग, ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रमुख विजय राम नाकरा म्हणाले, ‘बोलेरो हा आमचा विशेष ब्रँड दाखल झाल्यापासून त्याने १० लाख युनिटचा टप्पा पार केला आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. बोलेरोने भारतातील आघाडीच्या १० प्रवासी वाहनांमधील स्थान पुन्हा मिळवले असून, निम-शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांनी या ब्रँडवर दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे. यूव्ही क्षेत्रात अनेक नवी उत्पादने आली असली तरी, बोलेरो पॉवर+ यशस्वीपणे दाखल करण्यात आल्याने या ब्रँडला स्थिर प्रगती करण्यासाठी मदत झाली आहे. आगामी वर्षांतही बोलेरो भारतात तितकीच लोकप्रिय असेल, याची खात्री आहे.’

२०१६मध्ये दाखल झालेली बोलेरो पॉवर+ या शक्तिशाली ब्रँडसाठी क्रांती ठरली आहे आणि तेव्हापासून बोलेरो स्थिरपणे प्रगती करत आहे. अधिक वैशिष्ट्यपूर्ण असलेली बोलेरो पॉवर+ अधिक शक्ती, अधिक मायलेज व चालवण्याचा उत्तम अनुभव देणारी आहे. यामुळे हा ब्रँड अधिक आकर्षक ठरला आहे. आज, केवळ ब्रँडच्याच ग्राहकांची नाही, तर एकूणच अधिकाधिक ग्राहकांची पसंती या ब्रँडला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link